गेली पाच वर्ष रखडलेले जानवलीतील महामार्गा अंतर्गत “ते” काम अखेर मार्गी लावण्यास सुरुवात

जानवली ग्रामस्थांनी घेतली होती आक्रमक भूमिका

पावसाळ्यात पाणी साचून ग्रामस्थांसह तेथील व्यवसायिकांना होत होता त्रास

महामार्गावर जानवली येथे हॉटेल रिलॅक्स पासून ते साकेडी फाटा इथपर्यंतच्या रस्त्याच्या एका बाजूच्या ओहोळाच्या रुंदीकरण मुळे पाणी साचण्याची समस्या गेली पाच वर्षे जैसे थे स्थितीत होती. यामुळे साकेडी फाट्यासमोरील भागात पावसाळ्यात पाणी निचरा होत नसल्याने मारुती मंदिर नजीकच्या खोलगट भागात पाणी साचत तेथील व्यावसायिक व नागरिकांना त्रास होत होता. या बाबत जानवली ग्रामस्थांनी सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर या कामाची सुरुवात करण्यात आली. त्यामुळे याबद्दल ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त करण्यात आले. जानवली येथील हॉटेल रिलॅक्स नजिकच्या ओहोळाचे पाणी निचरा करण्याचे काम आज पासून हाती घेण्यात आले. रिलॅक्स हॉटेल नजीकच्या सर्विस रस्त्यालगतचा काही भागाचे भूसंपादन व्हायचे शिल्लक होते. त्यामुळे हा सर्विस रस्ता या ठिकाणी अरुंद होता. मात्र या कामाची सुरुवात करण्यात आली. हॉटेल रिलॅक्स नजीकच्या ओहळात पाईप घालण्यात येणार असून नव्याने भूसंपादन प्रक्रिया पूर्ण झालेला भाग ताब्यात घेण्याकरिता तेथील झाडे देखील काही दिवसांपूर्वी हटवण्यात आली. या ठिकाणापासून ते साकेडी फाटा इथपर्यंतचा भाग हा यापूर्वी खाजगी जमीन मालकांच्या ताब्यात होता. आता ही जागा महामार्ग प्राधिकरण च्या ताब्यात आल्यानंतर या ठिकाणच्या ओहोळात पाईप घालण्याचे काम सुरू करण्यात आले. साकेडी फाटा येथील परेश परुळेकर यांच्या हॉटेल पासून ते रिलॅक्स हॉटेल पर्यंतच्या भागातील पाईपलाईन चे काम करण्यात येणार आहे. यातील काही भाग ओपन गटार असल्याची माहिती महामार्ग प्राधिकरण चे उपभियंता अतुल शिवनीवार यांनी दिली. दरम्यान गेली पाच वर्षे हे काम प्रलंबित असल्याने या भागातील नागरिकांना ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागत होता. मात्र जानवली ग्रामस्थांनी याबाबत सातत्याने पाठपुरावा करून हे काम मार्गी लावून घेण्यास भाग पाडले. यावेळी उप अभियंता अतुल शिवनीवार, शाखा अभियंता डी. जे. कुमावत, केसीसी बिल्डकॉन चे व्यवस्थापक अशोक पांडे, सरपंच अजित पवार, उपसरपंच किशोर राणे, माजी जि प उपाध्यक्ष रंजन राणे, संदीप सावंत, ग्रा प सदस्य दामू सावंत, माजी सरपंच भगवान दळवी, ग्रामपंचायत सदस्य नितीन राणे, रमेश राणे, पोलीस पाटील मोहन सावंत, मकरंद सावंत, महेश मेस्त्री, प्रशांत राणे, दिलीप राणे आदी उपस्थित होते. या भागातील पाणी निचरा होण्याकरिता मोठ्या आकाराचे पाईप टाकण्यात येणार असून, जेणेकरून भविष्यात या ठिकाणी पुन्हा पाणी साचण्याची समस्या उद्भवू नये याची देखील काळजी घेण्यात येणार असल्याची माहिती सरपंच अजित पवार यांनी दिली.

दिगंबर वालावलकर, कणकवली

error: Content is protected !!