देशात तिसऱ्यांदा भाजपची सत्ता आली तशीच राज्यातही पुन्हा सत्ता आणणार

खासदार नारायण राणे यांची माहिती

सिंधुदुर्ग, रत्नागिरी मधील सर्व विधानसभा आम्ही जिंकणार

जसे केंद्रात तिसऱ्यांदा भाजपची सत्ता आली तशीच राज्यात सुद्धा पुन्हा भाजप आणि मित्र पक्षाच्या महायुतीची सत्ता येणार.कोकणातील उबाठा शिवसेना संपविली.उबाठा चे सर्व आडवे झाले. त्यांना पुरून उरलो आता कोकणात कोणाला बोट शिरू देणार नाही असा इशारा यावेळी नारायण राणे यांनी दिला. उबाठा सेनेने आयुष्यभर मुस्लिमविरोधी काम केले. मातोश्रीवर मुस्लिम समाजाला काय बोलतात तो शब्द मी येथे उल्लेख करू शकत नाही. आज उध्दव मिया भाई झाले.मात्र कोकणातील मुसलमान आमच्या सोबत आहेत. आणि राहतील.भारत एक संघ रहावा म्हणून आम्ही सर्वजण मोदींच्या नेतृत्वाखाली काम करत आहोत असे नारायण राणे म्हणाले.कुडाळ सह सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघ आम्ही जिंकणार असा विश्वासही यावेळी नारायण राणे यांनी व्यक्त केला.

कणकवली प्रतिनिधी

error: Content is protected !!