युवा संदेश प्रतिष्ठानच्यावतीने STS परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी करणार विमानाने ISRO सफर

युवा संदेश प्रतिष्ठानच्यावतीने आयोजित सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षा २०२४ मधील 4 थी,6वी व 7 वी या प्रत्येक इयत्तेतील सिंधुदुर्ग जिल्हा गुणवत्ता यादी तील प्रथम पाच अशा पंधरा गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीस स्वरुपात दिनांक १८ जून ते २१ जून २०२४ या कालावधीत विमानाने भारतीय अंतराळ संशोधन संस्था ( ISRO ) भेटीसाठी नेण्यात येणार आहे.
या सहली दरम्यान विक्रम साराभाई अंतरीक्ष केंद्र, कनकाकुन्नु पॅलेस, श्री पद्मनाभस्वामी मंदिर, नेपियर म्युजियम, त्रिवेंद्रम झू आदि स्थळांना भेट देण्यात येणार आहे.
या सहलीचा प्रारंभ मंगळवार दिनांक १८ जून २०२४ रोजी सकाळी ७:०० वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक कणकवली येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन होईल.युवा संदेश प्रतिष्ठानच्या अध्यक्षा मा.सौ संजना संदेश सावंत आणि संस्थापक अध्यक्ष मा.श्री संदेश ऊर्फ गोट्या सावंत यांच्या संकल्पनेतून या सहलीचे आयोजन करण्यात आले आहे या सहलीमुळे शालेय विद्यार्थ्यांना विमान प्रवासा सोबतच भारतीय अंतराळ संस्था, लघुग्रह अंतराळ प्रक्षेपण व दक्षिण भारतातील पर्यटन स्थळांना भेट देता येणार आहे.
इस्रो साठी निवड झालेली विद्यार्थी
इयत्ता चौथी
1.आराध्या अभय नाईक,१९०, शासकीय वसाहत कोणाळ कट्टा
2.दुर्वा रवींद्र प्रभु, 190, कुडाळ पडतेवाडी
3.अर्णव राजाराम भिसे,186, हरकुळ खुर्द गावडेवाडी
4.ओम शामसुंदर वाळके,184, कुडाळ पडतेवाडी
5.शौर्य वीरेंद्र नाचणे,180, विद्यामंदिर हायस्कूल कणकवली
इयत्ता 6 वी
1.आदित्य देविदास प्रभूगावकर, 174 टोपीवाला हायस्कूल मालवण
2.कर्तव्य तेजस बांदिवडेकर,170 राणी पार्वती देवी सावंतवाडी
3.रेवन अनंत राहुल,170, एस एन एम विद्यालय खारेपाटण
4 वेद राजेंद्र जोशी ,168,एस एम व्ही एम पडेल
5आर्या निलेश गावकर, 164,साळशी नंबर १
इयत्ता 7 वी
1.शौनक राजेंद्र जातेकर ,188 पोद्दार कणकवली
2.यशश्री गुरुनाथ ताम्हणकर ,180,मसुरे देऊळवाडा
3.मयंक महेश चव्हाण ,180 पोद्दार कणकवली
4.पारस देवदास दळवी ,174,जवाहर नवोदय सांगेली
5 सोहम बापूशेठ कोरगावकर, 168 राणी पार्वती देवी सावंतवाडी
अस्मिता गिडाळे, खारेपाटण