नारायण राणेंच्या स्वागतासाठी बांद्यात जय्यत तयारी

सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार तथा माजी केंद्रीयमंत्री नारायण राणे हे आज सायंकाळी ४ वाजता सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल होणार आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांचे बांदा येथे भाजपच्या माध्यमातून भव्य स्वागत करण्यात येणार आहे. श्री. राणे यांचे आज सायंकाळी मीपा एअरपोर्ट येथे आगमन होणार असून त्यानंतर ते सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल होणार आहेत. बांदा शहरात कट्टा कॉर्नर चौकात भाजप बांदा विभाग व माहराच्या वतीने ढोल पथकासह फटाक्यांच्या आतिषबाजित स्वागत करण्यात येणार आहे. तरी सर्व लोकप्रतिनिधी व भाजप पदाधिकान्यांनी मोठ्या संख्येत उपस्थित राहावे असे आवाहन भाजपचे प्रवक्ते संजू परब, भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर, महेश सारंग यांनी केले आहे