फ्लॅट फोडणार्या “त्या” चोरट्यांनी सावंतवाडीत आणखी १ दुचाकी चोरली

ते चोरटे आंबोलीच्या दिशेने गेल्यामुळे ते घाटमाथ्यावरील असावेत, असा पोलिसांचा संशय
सावंतवाडी येथील सबनिसवाडा-तोरणेपाणंद येथे फ्लॅट फोडून चोरी करणान्या चोरट्यांनी सावंतवाडीतील आणखी १ दुचाकी चोरी केल्याचे तपासात उघड झाले आहे. मात्र त्यातील पैट्रोल संपल्याने आंबोली घाटात गाडी टाकून त्यांनी पळ काइता. ही घटना सीसीटिव्ही कैद झाल्यामुळे हा प्रकार उघड झाला. दरम्यान ते चोरटे आंबोलीच्या दिशेने गेल्यामुळे ते घाटमाथ्यावरील असावेत, असा पोलिसांचा संशय आहे. त्या दृष्टीने आम्ही तपास करीत आहोत, अशी माहिती प्रभारी पोलिस निरिक्षक सरदार पाटील यांनी दिली. सावंतवाडी-सबनिसवाडा येथील तोरणपाणंद परिसरातील ४ फ्लॅट आणि १ बंद घर संबंधित चोरट्यांनी फोडले होते. त्यातील पेंटर्सन डिसोझा यांच्या घरातून १० हजाराची रोख रक्कम चोरीला केली होती, तर अन्य ठिकाणी त्यांना काही हाती लागले नव्हते. मात्र चोरी केल्यानंतर त्यांनी सावंतवाडी पालिकेच्या जिमखाना मैदानावर असलेल्या स्पोर्टस कॉम्प्लेक्स समोर उभी असतेती एक दुचाकी पळवून नेली. मात्र आंबोली घाटात गाडीतील पेट्रोल संपल्यामुळे ती गाडी तेथेच टाकून त्यांनी पुढच्या दिशेने पलायन केले. दरम्यान संबंधित युवकाने आपली गाडी चोरी झाल्याबाबत सावंतवाडी पोलिसांना माहिती दिली होती. त्यानंतर सायंकाळी ती गाडी आंबोली घाटात आढळून आली. त्यानुसार पोलिसांनी तपासाची सुत्रे फिरविण्यास सुरूवात केली आहे. चौरीचा माग काढण्यासाठी आणलेल्या श्वानाने स्पोर्टस कॉम्प्लेक्स पर्यंत माग दाखवला होता. त्यानंतर ते समोरील रस्त्यावर जावून घुटमळले होते. या पार्श्वभूमीवर त्या ठिकाणी असलेले सीसीटिव्ही तपासणी केल्यानंतर दोघे चोरटे कैद झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. त्यानुसार पोलिस पुढील तपास करीत आहेत.