ज्येष्ठ शिवसैनिकांनी शिवसेनेसाठी दिलेले योगदान न विसरण्यासारखे!

कनेडी विभागीय कार्यालयाच्या वतीने ज्येष्ठ शिवसैनिकांचा सन्मान

कनेडी विभागीय कार्यालयाच्या वतीने सत्कार कार्यक्रमाचे आयोजन

शिवसेना नेते माजी पर्यावरण मंत्री युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त कनेडी – हरकुळ विभागीय कार्यालयामध्ये युवा सेने मार्फत ज्येष्ठ शिवसैनिकांचा ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी जिल्हाप्रमुख संदेश पारकर,जिल्हा बँक माजी अध्यक्ष सतीश सावंत, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, उपजिल्हाप्रमुख बेनी डिसोजा, तालुकाप्रमुख उत्तम लोके, युवासेना उपजिल्हाप्रमुख मुकेश सावंत , तालुका समन्वयक गुरु पेडणेकर, युवा सेना विभाग प्रमुख संतोष सावंत, ज्येष्ठ शिवसैनिक आप्पा तावडे, राजू टाकेकर कुणाल सावंत, शिवप्रसाद पेंडूरकर, संजय सावंत शेखर सावंत बाळू गावकर रमण गावकर अशोक गावकर गणेश शिवडावकर, दिनेश वाळके, श्यामा परब, संदेश गुरव, संदीप गावकर, अर्जुन कांबळे शिवसैनिक उपस्थित होते.

कणकवली प्रतिनिधी

error: Content is protected !!