मासेमारीसाठी गेलेले तिघेजण पातीसह खाडीत बुडाले
एकजण बचावला, एक बेपत्ता, तर खलाशीचा मृतदेह सापडला
जाळ्यात अडकेला मृतदेह व पात स्थानिक मच्छिमारांनी काढली बाहेर
आचरा प्रतिनिधी
तळाशील खाडीमध्ये शनिवारी 8 जून रोजी रात्री मासेमारीसाठी गेलेली नौका जोराच्या पाऊस व वाऱ्यामुळे उलटल्याने बोटीतील दोन मच्छीमार बेपत्ता झाले होते. तर एक मच्छीमार युवक पोहत आल्याने किनाऱ्यावर सुखरूप परतला होता. ही घटना शिनिवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घडली. बचावलेल्या युवकांने आपल्या वडिलांची पात उलटली असल्याचे ग्रामस्थांना येऊन सांगितल्या नंतर स्थानिक मच्छीमारांनीं या दोन बेपत्ता मच्छीमारांचा शोध सुरू केला होता रविवारी सकाळी 10 वाजता बुडालेल्या अवस्थेत पात व खलाशी धोंडीराज परब यांचा मृतदेह आढळून आला मात्र पातमालक किशोर चोडणेकर यांचा मच्छिमार उशीरापर्यंत शोध घेत होते.
ताळाशील येतील किशोर महादेव चोडणेकर ( वय -55,) हे आपला मुलगा लावण्य किशोर चोडणेकर (वय – 16) वर्षे आणि खालशी धोंडीराज परब (वय 55 वर्षे) राहणारा तारकर्ली हे तळाशील खाडीमध्ये छोटी होडी घेऊन मासेमारीसाठी गेले होते. सदर मच्छीमार आपल्या बोटीसहित सर्जेकोट तळाशील येथे मच्छीमारी करत असताना रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास अचानक जोराचा पाऊस आणि वारा आल्यामुळे त्यांची पात नदीत उलटलेले होडीतील तिघेजण पाण्यात पडले. यातील लावण्य चोडणेकर हा युवक पोहत पोहत तळाशील किनारी आला व पात बुडाल्याची माहिती स्थानिकांना दिली. स्थानिक मच्छीमारांनी आपल्या नौकेद्वारे खाडीपात्रात त्यांचा शोध घेतला असता रात्री उशिरापर्यंत त्यांचा शोध लागला नाही. रविवारी सकाळपासून बेपत्ता असलेल्या दोन्ही मच्छीमारांचा शोध खाडीत व समुद्रात सुरू होता
धोंडीराज परब याचा मृतदेह जाळ्यात अडकलेल्या स्थितीत आढळला.
रविवारी सकाळी दांडी व तळाशील मधील ग्रामस्थांनी तळाशील खाडीत व तळाशील समुद्रात होड्याच्या सहाय्याने शोध मोहीम सुरु केली होती. होडीच्या सहाय्याने समुद्रात शोध चालू असताना खाडी नास्तालागतच्या समुद्रात जाळी तरंगताना दिसत होती होडी याच ठिकाणी असण्याशी शक्यता बाळावली जमलेल्या काही मच्छिमारांनी नौकेने जाळी दिसत असलेल्या ठिकाणी जात दोरखंडाला तरंगत असलेली जाळी बांधून ती ओढत समुद्र किनारी आण्याचा प्रयत्न चालू केला. यात दोनवेळा अपयश आले मात्र मच्छिमारांनी पुन्हा प्रयत्न करण्याचे ठरवले शोध मोहीमेसाठी दांडी येथून आलेले मच्छिमार व तळाशील येतील मच्छिमारांनी होडीतून पुन्हा समद्रात जात तरंगत असलेली जाळी दोरखंडाला बांधून किनाऱ्यावरील मच्छिमारांकडे देत किनाऱ्यावरून मच्छिमारांना ओढण्यास सांगितले दोरखंड ओढत असताना बुडालेल्या यशगंगा पातीचे पुढील भागाचे टोक जाळ्यात अडकलेले दिसले तसेच धोंडीराज परब यांचा मृतदेह जाळ्यात अडकलेल्या स्थितीत आढळून आला. अथक मेहनती नंतर बुडलेली पात व जाळ्यात अडकलेल्या अवस्थेतील धोंडीराज परब यांचा मृतदेह किनारी आणण्यात यश आले. या कामात दांडी येथील हर्षद चोडणेकर, मिलिंद तारी, जगदीश तोडणकर, अक्षय तांबे, सुजित नळेकर, दादा कोचरेकर वसंत गांवकर व तळाशील येथील ग्रामस्थ यांनी मेहनत घेतली.