दुर्लक्ष झाल्यास त्या दुर्घटनेला अधिकारी जबाबदार राहतील- अशोक सावंत
दोन्ही घटना गंभीर; वीज अधिकाऱ्यांना धरले धारेवर..
सावंतवाडी वीज कंपनीच्या दुर्लक्षामुळे सावंतवाडी व बांदा येथे घडलेल्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोघे कंत्राटी कर्मचारी जखमी झाले आहेत, यांची गंभीर दखल कंत्राटी कामगार संघटनेचे नेते अशोक सावंत यांनी भेट घेतली. दरम्यान कंत्राटी कर्मचारी जखमी होण्याचे प्रमाण वाढले आहे. आजपर्यंत ९ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे योग्य ती खबरदारी घ्या तज्ञ वायरमेन नेमा अशी मागणी यावेळी सावंत यांनी वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांनी कडे केली. अशा प्रकारे दुर्लक्ष झाल्यास त्या दुर्घटनेला अधिकारी जबाबदार राहतील असा इशारा त्यांनी यावेळी दिला. दरम्यान जखमी झालेल्या घननिल मिशाळ यांची त्यांनी विचारपूस केली