मोदींच्या शपथविधी समारंभाला भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांना निमंत्रण
सिंधुदुर्गातील भाजपाच्या अन्य पदाधिकाऱ्यांना देखील आहे निमंत्रण
मोदी सरकारच्या तिसऱ्या पर्वाला सुरुवात होत असून नरेंद्र मोदी यांचा पंतप्रधान पदाचा शपथविधी सोहळा रविवार दिनांक 09 जून रोजी दिल्ली येथे मोठ्या थाटामाटात संपन्न होणार आहे.या सोहळ्यासाठी देशातील सर्व भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांना विशेष निमंत्रित केलेले आहे.
भाजपचे प्रदेश पदाधिकारी,सर्व खासदार आणि आमदार हे सुद्धा सदर सोहळ्याला निमंत्रित आहेत.सिंधुदुर्ग जिल्ह्यातून प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर,जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत,आमदार नितेश राणे,संघटनमंत्री शैलेंद्र दळवी हे या सोहळ्यासाठी उपस्थित राहणार असल्याची माहिती प्राप्त झाली.
रत्नागिरी सिधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात प्रथमच भाजपाला हक्काचा खासदार मिळालेला असून हा विजय कोकण भाजपाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारा आहे. त्यामुळे या सोहळ्याचे साक्षीदार होण्याची संधी जिल्हाध्यक्ष या नात्याने मला मिळालेली आहे. हा भाग्याचा क्षण आहे.खरंतर या विजयाचे खरे शिल्पकार हे लोकसभा मतदारसंघातील माझे सर्व सहकारी आहेत,त्या सर्वांच्या वतीने मी या सोहळ्याचा साक्षीदार होण्यासाठी दिल्ली येथे जाणार आहे अशी प्रतिक्रिया प्रभाकर सावंत यांनी बोलताना व्यक्त केली.
कणकवली प्रतिनिधी