ग्राहक पंचायत महाराष्ट्र शाखा कणकवलीची वार्षिक सभा संपन्न

कणकवली तालुका संघटनेच्या काही पदाधिकाऱ्यांची फेर निवड

गाहक पंचायत महाराष्ट्र तालुका शाखा कणकवलीची वार्षिक सभा ज्येष्ठ नागरिक सेवा संघ कार्यालय बॅडमिंटन हाॅल कणकवली येथे श्री.सिताराम कुडतरकर जिल्हा संघटक यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या सभेत विषय पत्रिकेनुसार सर्व विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी सचिव सौ.पूजा सावंत यांनी संस्थेचा कार्याचा आढावा वाचन केले.
यावेळी जिल्हा संघटक मा.सिताराम कुडतरकर यांनी आयत्या वेळेच्या विषयावर चर्चा करताना सांगितले की कणकवली तालुक्यात दहावी व बारावी परीक्षेत प्रथम तीन क्रमांक प्राप्त झालेल्या विद्यार्थी यांचा सत्कार करण्याविषयी सर्वानुमते ठरविण्यात आले .ग्राहक पंचायत महाराष्ट्र तालुका शाखा कणकवली ,ज्येष्ठ नागरिक संघ कणकवली व पेन्शनर असोसिएशन कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रम दि.16जून रोजी सकाळी 11वाजता घेण्याचा ठरविले. यावेळी मा.सिताराम कुडतरकर ग्राहक पंचायत शाखा कणकवली च्या अध्यक्षा सौ श्रद्धा सूर्यकांत कदम सचिव सौ पूजा प्रकाश सावंत व उपाध्यक्षा गिताजली कामत जिल्हा महिला प्रतिनिधी सौ रिमा राजन भोसले मॅडम तसेच संस्थेचे सल्लागार मा.मनोहर पालयेकर संघटक विनायक पाताडे सहसंघटक मा सुभाष राणे श्री.प्रकाश वाळके सदस्य श्री राजन भोसले आएशा सय्यद मॅडम आणि श्री.विलास चव्हाण उपस्थित होते. यावेळी ग्राहक पंचायत महाराष्ट्र तालुका शाखा कणकवली च्या काही पदाधिकारी यांची फेरनिवड करण्यात आली.त्यामध्ये संघटक शेळके जे.जे.सहसंघटक राजन भोसले कोषाध्यक्ष श्री.सुभाष राणे सदस्य श्री.विलास चव्हाण यांचे विशेष अभिनंदन व शुभेच्छा देण्यात आल्या. शेवटी सौ.श्रद्धा कदम यांनी आपले मनोगत व्यक्त केले. गेले वर्षभर विविध उपक्रम राबविण्यासाठी सर्वानी चांगले सहकार्य केले.त्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त केले.अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात सभा संपन्न झाली .

कणकवली प्रतिनिधी

error: Content is protected !!