सामाजिक राजकीय जीवनात फेल गेलेल्या मंगेश गुरवांची वैफल्यातून टीका

सरपंच प्राची इस्ववलकर यांचे प्रत्युत्तर

माझा भाजपा पक्ष प्रवेश पैशाच्या आमिषाने किंवा वैयक्तिक स्वार्था साठी नसून मागील १०वर्षात जो गावाचा विकास खुंटला होता ,त्याला चालना देण्यासाठी आम.नितेश राणे यांच्यावर विश्वास ठेवून घेतला गेलेला हा निर्णय आहे .काल शिवसेना उपतालुका प्रमुख मंगेश गुरव यांनी खारेपाटण सरपंच यांच्या भाजपा प्रवेशा नंतर इस्वलसकर यांनी वैयक्तिक स्वार्थासाठी भाजपा मधे प्रवेश केला अशी तिखट टीका केली होती. त्याला सरपंच प्राची इस्वलकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
मंगेश गुरव यांनी राजापूर तालुक्यातील आपल्या मूळ गावी निधी मिळवून दिला पण खारेपाटण गावांसाठी त्यांना निधी आणता आलेला नाही.ही खारेपाटण ग्रामस्थांशी केलेली गद्दारी नाहीतर काय?
स्वतः मा. एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना गावच्या तालुक्या संबंधीचा प्रस्ताव मंत्रालयात अडकून आहे. व गावाची विकासकामे स्थानिक आमदारांकडून अडवली जातात असे म्हणणे ही मंगेश गुरव यांची राजकीय अपरिपक्वता सिद्ध करते .तरी स्वतः ग्रा. पं. निवडणुकीत सदस्य पदासाठी दोन वेळा दारून पराभव झालेला असताना त्यांनी सरपंच पदाचा राजीनामा मागणे हे हास्यास्पद आहे.कोणताही विजय हा सांघिक असतो.माझा विजय हा माझ्या गावातील ग्रामस्थांनी दाखवलेल्या विश्वासाचां विजय आहे .त्यामुळे सरपंच पदाचा राजीनामा देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.
माझ्या दीड वर्षाच्या काळात मुख्यमंत्री शिंदे साहेब व आम.नितेश राणे साहेब यांच्या माध्यमातून झालेली विकास कामे ही सर्वांच्या नजरे समोर आहेत.त्यामुळे मी माझे जुने सहकारी मंगेश गुरव यांच्या टीकेला जास्त महत्व देत नाही.विरोधकांशी संगनमत करून पर्यायी ग्रा. पं.चालवण्याचा त्यांचा हेतू साध्य न झाल्याने तसेच राजकीय ,सामजिक क्षेत्रात अपयशी झाल्याने ते वैफल्यग्रस्त झाले आहेत.श्री देव कालभैरव व धनी रवळनाथ त्यांना सद्बुद्धी देवा अश्या प्रकारे सरपंच प्राची इस्वलकर यांनी आपले मत व्यक्त केले आहे.

अस्मिता गिडाळे, खारेपाटण

error: Content is protected !!