सत्संग घराचा उद्घाटन सोहळा रविवारी
कुडाळ, प्रतिनिधी
ज्ञान, कर्म, भक्ती आणि मुक्ति (रजि. एफ १७९८) यांच्या सत्संग घर (नवीन मठ) उद्घाटन सोहळा येत्या रविवारी ९ जून २०२४ रोजी बावळाट पंचायतन शेत्रात ञान, कर्म, भक्ती आणि मुक्ति संस्था फौजदारवाडी (बावळाट-सावंतवाडी) येथे मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. यावेळी श्री संत सदगुरु आनंदी गुरुजींच्या मुख्य उपस्थितीत होईल. यानुसार, रविवार ९ जून रोजी श्री संत सदगुरु आनंदी गुरुजींच्या हस्ते फीत कापून सत्संग घराचे उद्घाटन होईल. तसेच दीपप्रज्वलन आणि स्वागत, सकाळी ९.३० ते १० भक्तिगीत भजने, सकाळी १० ते ११
श्री संत सदगुरु आनंदी गुरुजींच्या दिव्य वाणीतून
परम संतांच्या वाणीवर आध्यात्मिक प्रवचन होईल. तरीही भाविकांनी संत वचनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.