विजेच्या खांबावरून कोसळल्यामुळे सावंतवाडीत कंत्राटी वायरमन जखमी..
सावंतवाडी विजेच्या खांबावरून कोसळल्यामुळे सावंतवाडीत कंत्राटी वायरमन जखमी झाला आहे. ही घटना आज साडेबारा वाजण्याच्या सुमारास मच्छी मार्केट परिसरात असलेल्या इको बँकसमोर घडली. घननिल मिशाळ (वय २७) असे त्याचे नाव आहे. त्याला अधिक उपचारासाठी कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तो येथील मच्छी मार्केट परिसरात ट्रांसफार्मर वर चढून काम करत होता, दरम्यान अचानक तो खाली कोसळला. यात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. यावेळी त्या ठिकाणी असलेल्या नागरिकांनी त्याला तात्काळ रिक्षात घालून कुटीर रुग्णालय हलविले.