माजगाव येथे खाजगी बस व एसटी व मध्ये अपघात..

सावंतवाडी खाजगी बस एसटी यांच्यात समोरासमोर धडक बसून माजगावात अपघात झाला आहे. यात एसटी बसचा चालक केबीन मध्ये अडकला आहे. त्याला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तर अन्य काही प्रवासी जखमी झाले आहेत. ही घटना आज सव्वा चार वाजण्याच्या सुमारास जुन्या मुंबई गोवा महामार्गावर माजगाव येथे घडली. घटनास्थळी मोठी गर्दी झाली आहे. दोन्ही बाजूने वाहतूक खोळंबली आहे.