कनेडी प्रशालेत “दहावी,बारावी नंतर पुढील शैक्षणिक संधी” यां विषयावर मार्गदर्शन शिबीर संपन्न.

पालकांनी स्वतःची स्वप्न मुलांवर लादू नयेत-कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सतीश सावंत यांचे प्रतिपादन.

कणकवली/मयुर ठाकूर.

कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई संचालित श्री मोहनराव मुरारीराव सावंत ज्यूनी,कॉलेज ऑफ आर्टस् अँड कॉमर्स कनेडी, श्री तुकाराम शिवराम सावंत ज्यूनी,कॉलेज ऑफ सायन्स आणि बालमंदिर कनेडी आयोजित “दहावी, बारावी नंतर पुढील शैक्षणिक संधी”यां विषयावर मार्गदर्शन शिबीर संपन्न झाल. यां मार्गदर्शन शिबिरात पांचक्रोशीतील विद्यार्थ्यांनी तसेच पालकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावलेली होती.
शिवाजी विद्यालय काळाचौकी, मुंबई यां प्रशालेचे माजी मुख्याध्यापक आणि माधवराव पवार माध्यमिक विद्यालय कोकिसरे वैभववडी यां प्रशालेचे विद्यमान सचिव श्री जनार्दन नारकार यांनी यावेळी प्रमुख मार्गदर्शन केल.
कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई चे अध्यक्ष सतीश सावंत यांनी आपल्या मनोगतात दहावी बारावी मध्ये यशस्वी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शनही केले.पालकांनी आपल्या मुलांवर स्वतःची स्वप्न लादू नयेत. मुलांना नेमक काय व्हायचं आहॆ याचा अभ्यास करून मुलांच्या आवडीने त्यांना पुढील शैक्षणिक सोय उपलब्ध करून द्याव्यात अश्या सूचना देखील त्यांनी यावेळी केल्या. दहावी झालेल्या विद्यार्थ्यांना फक्त सायन्स,कॉमर्स, आर्टस् किव्वा डिप्लोमा,इंजिनिअरिंग, डॉक्टर किव्वा आयटी सेक्शन इतकंच माहिती असत तर याव्यतिरिक्त देखील अनेक शैक्षणिक संधी उपलब्ध आहेत आणि त्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना कळव्यात म्हणुन यां शिबिराचे आयोजन केल्याचे देखील सांगितले. नारकर सर यांचं मार्गदर्शन घेण्यासाठी विविध संस्था विद्यार्थ्याकडून फी घेऊन शिबीर रबावतात मात्र नारकर सर यांच्यासोबत माझे चांगले संबंध असून ते आपल्यासाठी आपला बहुमूल्य वेळ मोफत डेट आहेत त्यामुळे त्यांचं मार्गदर्शन विद्यार्थ्यांनी घ्यावं अश्या सूचना देखील यावेळी सतीश सावंत यांनी केल्या.श्री नारकर सर यांचं मार्गदर्शन स्वतः सतीश सावंत यांनी देखील मुलांसोबत बसून ऐकलं आणि मुलांना एक वेगळा आदर्श घालून दिला.
यां मार्गदर्शन शिबीर प्रसंगीं प्रशालेचे चेअरमन आर एच सावंत सर, मुख्याध्यापक दळवी सर,पर्यवेक्षक बुराण सर तसेच इतर संस्था पदाधिकारी आणि शिक्षक, मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते.

error: Content is protected !!