“दहावी-बारावी नंतर पुढील शैक्षणिक संधी” या विषयावर कनेडी प्रशालेत सोमवार दि. 3 जून रोजी मार्गदर्शन शिबीर.

कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई चे अध्यक्ष सतीश सावंत यांनी केले विद्यार्थ्यांना उपस्थित राहण्याचे आव्हाहन.

कणकवली/मयुर ठाकूर.

कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई संचलित माध्यमिक विद्यामंदिर कनेडी श्री. मोहनराव मुरारी सावंत जुनियर कॉलेज ऑफ आर्ट्स अ‍ॅण्ड कॉमर्स कनेडी श्री. तुकाराम शिवराम सावंत जुनियर कॉलेज ऑफ सायन्स कनेडी या आपल्या प्रशालेत सोमवार दिनांक 3/6/2024 रोजी सकाळी ठीक 10. 00 वाजता दहावी,बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी “दहावी, बारावी नंतर पुढील शैक्षणिक संधी” या विषयावर माध्यमिक विद्यामंदिर कनेडी प्रशालेच्या ज्ञानदीप सांस्कृतिक भवन येथे व्याख्यानाचे आयोजन करण्यात आलेले आहे.यामध्ये प्रमुख मार्गदर्शक म्हणुन सन्माननीय श्री. जनार्दन नारकर (माजी मुख्याध्यापक विद्यमान सचिव)
माधवराव पवार माध्यमिक विद्यालय कोकिसरे हें असणार आहेत.तरी बारावी उत्तीर्ण विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी या व्याख्यानासाठी उपस्थित राहावे असे आव्हान कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबई चे अध्यक्ष सतीश सावंत यांनी केले आहॆ.

error: Content is protected !!