कविवर्य नारायण सुर्वे, कविवर्य वसंत सावंत काव्य पुरस्कारासाठी आवाहन

नांदगाव-कणकवली येथील किशोर मोरजकर चॅरिटेबल ट्रस्ट (रजि.) च्या वतीने कविवर्य नारायण सुर्वे आणि कविवर्य वसंत सावंत यांच्या स्मृती प्रित्यर्थ त्यांच्या नावाने काव्य पुरस्कार देण्यात येणार आहेत. सदर पुरस्कार योजनेत कोणत्याही वयातील कोणत्याही कवी – कवयित्रीला सहभागी होता येईल.कवींनी आपल्या सर्वोत्कृष्ट पाच कविता खालील व्हॉटसअप नंबरवर पाठवणे गरजेचे आहे.
गुणवत्ता असणाऱ्या कवींना प्रेरणा मिळावी या उद्देशाने गुणवंत कवींचा कविवर्य सुर्वे आणि कविवर्य सावंत यांच्या नावाचे पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे.दोन्ही पुरस्कार विजेत्या कवींना प्रत्येकी १५०० रुपये, स्मृती चिन्ह, शाल आणि ग्रंथ भेट देण्यात येणार आहे. पुरस्कारासाठी अंतिम निवड मान्यवर कवींच्या परीक्षणातून केली जाणार आहे. पुरस्कारासाठी कविता पाठविण्याची अंतिम तारीख ३० जून असून प्रवेश फी २०० रुपये आहे. प्रवेश फी पाठविल्या नंतर त्याच्या स्क्रीनचा फोटो पाठवणे आवश्यक आहे. कविता पाठविण्यासाठी व्हॉटसअप नंबर तसेच प्रवेश फी पाठविण्यासाठी गुगल नंबर – 9096564410.अधिक माहितीसाठी याच नंबरवर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

कणकवली प्रतिनिधी

error: Content is protected !!