जि.प माजी अध्यक्ष संदेश सावंत व जि.प.माजी अध्यक्षा संजना सावंत यांच्या माध्यमातून भात बियाणे वाटप

भिरवंडे खलांतर – गांधीनगर येथील शेतकऱ्यांसाठी 300 किलो मोफत भात बियाणे वाटप

जिल्हा परिषद माजी अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत- सौ. संजना संदेश सावंत यांच्या माध्यमातून भिरवंडे भाजपच्या वतीने भिरवंडे व खलांतर – गांधीनगर येथील शेतकऱ्यांसाठी मोफत भात बियाणे वाटप शुभारंभ करण्यात आला. गावातील शेतकऱ्यांना प्रत्येकी 2 किलोग्रॅम भात बियाणे वाटप करण्यात आले.
जिल्हा परिषद सिंधुदुर्ग माजी अध्यक्ष मा.संदेश उर्फ गोट्या सावंत यांच्या हस्ते मोफत भात बियाणे वाटपाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी खलांतर गांधीनगर सरपंच श्री.मंगेश बोभाटे, सर्वश्री विजय सावंत, रमेश सावंत, प्रकाश मराठे, मोहन सावंत, संतोष सावंत, सतीश सावंत तसेच गावातली शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.गावातली तब्बल 150 शेतकऱ्यांना उत्तम दर्जाचे संकरित भात बियाणे देण्याचा स्तुत्य उपक्रम श्री संदेश उर्फ गोट्या सावंत यांनी राबवल्याबद्दल गावातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

अस्मिता गिडाळे,खारेपाटण

error: Content is protected !!