कणकवलीतील अमित सावंत यांचे निधन
हॉटेल कमल चे मालक बाळा सावंत यांना पुत्रशोक
कणकवलीतील हॉटेल कमल चे मालक बाळा सावंत यांचा मुलगा अमित गोपाळ (बाळा) सावंत (40) यांचे आज सायंकाळच्या सुमारास हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. कणकवली टेंबवाडी येथील घरात अमित हे झोपलेले असतानाच त्यांना तीव्र हृदयविकाराचा झटका आला. बराच वेळ ते उठत नसल्याने त्यांना तातडीने खाजगी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तत्पूर्वी त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले. अमित यांचा कणकवलीत मोठा मित्रपरिवार होता. त्यांच्या पश्चात वडील, भाऊ, भावजय, विवाहित बहिण असा परिवार आहे. अमित यांच्या निधनाची माहिती मिळताच अनेकानी कणवलीतील खाजगी दवाखान्यात धाव घेतली होती. तसेच टेबवाडी येथील त्यांचे निवासस्थानी देखील अनेकांनी गर्दी केली होती. अमित याच्यावर उद्या बुधवारी सकाळी 9.30 वाजता येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
दिगंबर वालावलकर/ कणकवली