फ्लाय९१ची पुणे आणि जळगावसाठी सेवा सुरु
गोवा-जळगाव आणि पुणे-जळगाव दरम्यान सेवा
प्रतिनिधी । सिंधुदुर्ग : गोवा स्थित फ्लाय९१ या विमान कंपनीने आपले देशांतर्गत नेटवर्क वाढवण्यासाठी जळगाव आणि पुणे दरम्यान उड्डाणे जोडण्याची घोषणा केली आहे. या घोषणेनंतर पुणे आता फ्लाय९१ चे सातवे देशांतर्गत गंतव्यस्थान बनले आहे.असे फ्लाय ९१ ने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
प्रसिद्धी पत्रकात पुढे म्हटले आहे, फ्लाय९१ने २४ मे पासून गोवा ते जळगाव आणि जळगाव ते गोवा सेक्टरवरील विमान सेवेच्या संख्येत वाढ करण्याची घोषणा केली होती. एअरलाइन आता गोव्याच्या सुंदर किनारे आणि जळगावच्या वारश्या दरम्यान दररोज कनेक्टिव्हिटी ऑफर करत आहे.पुणे हे फ्लाय९१ नेटवर्कवरील ७वे देशांतर्गत गंतव्यस्थान आहे. एक अग्रगण्य प्रादेशिक वाहक म्हणून, आम्ही फ्लाय९१ येथे देशातील कमी सेवा असलेल्या आणि सेवा न मिळालेल्या विमानतळांवर अखंड प्रवास अनुभव देण्यासाठी समर्पित आहोत. पुणे आणि जळगाव दरम्यान उड्डाणे सुरू केल्याने आणि गोवा आणि जळगाव दरम्यान वाढलेल्या वारंवारतेमुळे आयटी कर्मचारी, व्यापारी, पर्यटक आणि या स्थळांदरम्यान नियमितपणे प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांना फायदा होईल,” असे फ्लाय९१ एमडी आणि सीईओ मनोज चाको यांनी सांगितलं.
प्रादेशिक विमान कंपनी मे महिन्यापासून पुणे-जळगाव-पुणे दरम्यान दर आठवड्याला चार उड्डाणे चालवेल आणि येत्या काही महिन्यांत या मार्गावर दररोज उड्डाणे सुरू करण्याची अपेक्षा आहे. पुणे (PNQ) आणि जळगाव (JLG) दरम्यान दर आठवड्याला ४ उड्डाणे चालतील. याव्यतिरिक्त, फ्लाय९१ जळगाव आणि गोवा दरम्यान आठवड्यातून तीन वेळा दैनंदिन फ्लाइटची वारंवारता वाढवेल. या विमान सेवेचे भाडे १९९१ रुपयांपासून सुरु होते, हा नवीन मार्ग दोन गंतव्यस्थानांदरम्यान थेट आणि कार्यक्षम प्रवास प्रदान करणार, तसेच या सेवेमुळे प्रवाशांची सुलभता सुधारेल. भविष्यात, फ्लाय९१ पुणे आणि इतर टियर II आणि टियर III गंतव्यस्थानांदरम्यान हवाई कनेक्टिव्हिटी वाढवण्याची योजना आखत आहे, असे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
प्रतिनिधी, कोकण नाऊ, सिंधुदुर्ग.