एक दिवस छोट्या दोस्तांचा
युवा संदेश प्रतिष्ठानच्या वतीने आयोजन
युवा संदेश प्रतिष्ठानच्या वतीने यावर्षीही एक दिवस छोट्या दोस्तांचा हा धमाल मस्तीचा अभिनव उपक्रम रविवार दिनांक २६ मे २०२४ रोजी जि प शाळा कनेडी बाजारपेठ , सांगवे येथे सकाळी ९ ते १२.३० या वेळेत आयोजित करण्यात आला आहे.
हा महोत्सव नाटळ व हरकुळ जिल्हा परिषद मतदार संघ मर्यादीत असून अंगणवाडी ते ७वी पर्यंतच्या मुलांना सर्व मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे
जादूचे प्रयोग व मनोरंजक खेळ
मुंबई येथील प्रसिध्द बाल कलाकाराचे जादूचे प्रयोग पाहता येतील. व मनोरंजक खेळातून बक्षिसांची लयलूट करता येईल.
आंबे खाण्याची स्पर्धा
ही दोन गटात घेण्यात येणार आहे.
पहिला गट :अंगणवाडी ते ३री असा असून पाहिल्या तीन क्रमांकांना अनुक्रमे १५००,१०००,७०० रू चे शैक्षणिक साहित्य बक्षिस म्हणून देण्यात येणार आहे.
दुसरा गट : इ. ४थी ते ७वी
असा असून पाहिल्या तीन क्रमांकांना अनुक्रमे २५००,१५००,१००० रू चे
शैक्षणिक साहित्य बक्षिस म्हणून देण्यात येणार आहे.
तसेच उपस्थित सर्व मुलांना मोफत लकी ड्रॉ कुपन देऊन पहिल्या १० विजेत्यांना आकर्षक शैक्षणिक साहित्य बक्षिस म्हणून देण्यात येणार आहे.
आंबे खाण्याच्या स्पर्धेत भाग घेण्यासाठी नाव नोंदणी आवश्यक असून अधिक माहितीसाठी श्री. पवार सर मोब.९४२३३११०७९ /९४२२५६५२८०/९४२०२०६३२६/९४२१२६६७५१ यांच्याशी संपर्क साधण्याचे व सर्वांनी उपस्थीत रहाण्याचे आवाहन युवा संदेश प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मान. श्री संदेश उर्फ गोट्या सावंत आणि सौ. संजना संदेश सावंत (माजी जि. प. अध्यक्ष) यांनी केले आहे.
टीप
युवा संदेश प्रतिष्ठानच्या वतीने *मराठी भाषा दिनाच्या औचित्याने आयोजित स्पर्धांचा *बक्षिस वितरण समारंभ रविवार २६ मे २०२४ रोजी सकाळी ९ ते १२ या वेळेत जि प शाळा कनेडी बाज़ारपेठ येथे होणा-या एक दिवस छोट्या दोस्तांचा या कार्यक्रमात होईल तरी सर्वानी नोंद घेण्याचे आवाहन युवा संदेश प्रतिष्ठान च्या वतीने करण्यात आले आहे.