कणकवली शहरामध्ये सिंगल युज प्लास्टिक वापरणा-यांवर कारवाई

मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांचा व्यापाऱ्यांना दणका

21 हजार 900 रुपयांचा दंड

स्वच्छ सर्वेक्षण 2024 व माझी वसुंधरा अभियानांतर्गत केंद्र शासनाच्या पर्यावरण,वने व हवामान बदल विभाग अधिसूचना क्र.सी.जी.डी.एल.अ-12082021-228947,दि.12/08/2021, प्लास्टिक कचरा व्यवस्थापन नियम,2021, अधिनियमानुसार, कणकवली नगरपंचायतीचे मा. मुख्याधिकारी श्री.परितोष कंकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली प्लास्टिक बंदी पथकाद्वारे कणकवली शहरात दिनांक 17/05/2024 रोजी सिंगल युज प्लास्टिक व सबंधित वस्तू बाळगणाऱ्या आस्थापनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.सुमारे 6 आस्थापनांवर दंडात्मक कारवाई करून रक्कम रु 21,900/- वसूल करण्यात आले. ह्या पथकामध्ये पाणीपुरवठा व स्वच्छता अभियंता श्रीम. सोनाली खैरे ,स्वच्छता निरीक्षक श्री.विनोद सावंत ,श्रीम.ध्वजा उचले, शहर समन्वयक श्रीम. वर्षा कांबळे, आरोग्य लिपिक सतिश कांबळे, श्री.प्रविण गायकवाड, श्री. रविंद्र म्हाडेश्वर, श्री. सचिन तांबे, श्री. संजय राणे, श्री. राजेश राणे, श्री. विनोद जाधव,व इतर नगरपंचायतीचे कर्मचारी ह्यांच्या द्वारे प्लास्टिक बंदी मोहीम राबविण्यात आली. यावेळी 25किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले.यावेळी शहरातील व्यापारी वर्ग व नागरिकांना कापडी पिशवीचा जास्तीत जास्त वापर करून पर्यावरण रक्षणासाठी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले.

error: Content is protected !!