अक्षरांचा आनंद हा चिरंजीव असतो –सुरेश ठाकूरश्रीकांत सांबारी यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त रामेश्वर वाचन मंदिरात अक्षरोत्सव साजराआचरा–अर्जुन बापर्डेकरअक्षरांचा आनंद हा चिरंजीव चिरायू असतो.भाषेच्या श्रवण,भाषण,वाचन, लेखन या भाषिक कौशल्यामुळे प्रत्येकाचे व्यक्तिमत्त्व विकसित होण्यास मदत होते.म्हणूनच प्रत्येकाने भाषिक कौशल्याद्वारे लेखनाचा, अक्षरांचा आनंद घेतला पाहिजे. आपले वय कितीही झाले तरी अक्षरातून लेखनातून आपण चिरंजीव राहिले पाहिजे असे मत कोमसाप मालवण तालुका अध्यक्ष सुरेश ठाकूर यांनी आचरा येथे व्यक्त केले.रामेश्वर सार्वजनिक वाचनमंदिराचे सलग सतरा वर्षे अध्यक्षपद भूषविलेले श्रीकांत सांबारी यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त आयोजित आनंद अक्षरोत्सवाच्या या प्रबोधनात्मक कार्यक्रमात ते बोलत होते.यावेळी त्यांच्या सोबत वाचनालयाचे अध्यक्ष बाबाजी भिसळे, उपाध्यक्ष अशोक कांबळी, कार्यवाह अर्जुन बापर्डेकर, समिती सदस्य श्रीमती वैशाली सांबारी, जयप्रकाश परुळेकर, भिकाजी कदम, विरेंद्र पुजारे, दिपाली कावले, ग्रंथपाल विनिता कांबळी, सांस्कृतिक समिती सदस्य राजा जोशी, भावना मुणगेकर, श्रद्धा महाजनी, विलास आचरेकर, वर्षा सांबारी,कामिनी ढेकणे,रुपेश साटम, नरेंद्र कोदे,यांसह वैभवशाली पतसंस्था चेअरमन मंदार सांबारी,सांबारी प्रेमी सिताराम सपकाळ,लक्ष्मण आचरेकर,कोचरेकर, रामचंद्र कुबल, मधुरा माणगांवकर, मेहंदळे सर, पेडणेकर सर, जगन्नाथ साने यांसह अन्य मान्यवर आदी उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पुजन आणि ज्ञानेश्वरी ग्रंथ पुजनाने झाली.यावेळी रुपेश साटम, ग्रंथपाल विनिता कांबळी, नरेंद्र कोदे यांना तसेच ग्रंथालय कर्मचारी महेश बापर्डेकर,स्वप्नील चव्हाण समृद्धी मेस्त्री यांना अक्षरपूजक म्हणून गौरविण्यात आले.या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील सोळा मान्यवरांच्या हस्ते वाचनालयाला अक्षरदान म्हणजेच पुस्तक भेट देण्यात आली.सुत्रसंचलन भावना मुणगेकर यांनी केले.