कणकवली नगरपंचायत मार्फत मान्सूनपूर्व नियोजन

गटार सफाईचे काम युद्धपातळीवर हाती

 पावसाळयापूर्वी शहरातील सर्व व्‍हाळी व गटारांमध्‍ये गाळ, प्‍लॅस्‍टीक व कचरा साचल्‍याने अल्‍प प्रमाणात पाऊस झाला तरी व्‍हाळी व गटारांचे पाणी रस्‍त्‍यांवर येते त्‍यामुळे स्‍थानिक रहिवाशांना त्‍याचा नाहक त्रास सहन करावा लागतो. स्वच्छतेअभावी व्‍हाळी व गटारांमध्‍ये घाणीचे थर साचून राहतात त्‍यामुळे परिसरामध्‍ये दुर्गंधी पसरुन नागरीकांच्‍या आरोग्‍याचा प्रश्‍न उद्भवतो त्‍याचप्रमाणे डासांच्‍या प्रादुर्भावाने अनेक साथीचे आजार पसरण्‍याचा धोका असतो.

या अनुषंगाने कणकवली शहरातील नागरीकांच्‍या आरोग्‍याचे हित लक्षात घेवून कणकवली नगरपंचायत मार्फत शहरातील गटारे व व्‍हाळी साफसफाईची कामे जलदगतीने पूर्ण करण्‍यात येत आहेत. शहरातील मुख्‍य व अंतर्गत रस्‍त्‍यांच्‍या दुतर्फा असलेली गटारे, दळवी वकील शेजारील, उबाळे मेडिकल कडील, सिद्धार्थनगर, सोनगेवाडी, नाथ पै नगर, सरस्वत बँक शेजारील, टेंबवाडी यथील, गणपती साना याठिकाणी असणारी मोठी गटारे/व्‍हाळी पाऊस सुरु होण्‍यापूर्वी पूर्णपणे साफ करुन घेण्‍याच्‍या उद्देशाने नगरपंचायत मार्फत आवश्‍यक ती कार्यवाही करण्‍यात येत आहे.
त्‍यानूसार कणकवली शहरातील दळवी वकील शेजारील, हर्णे आळी, तेली आळी, उबाळे मेडिकल, सिद्धार्थनगर,नगरपंचायत रोड, मसुरकर किनई या भागातील गटारे व व्‍हाळी साफसफाईचे काम पूर्ण झालेले आहे व छोट्या व्‍हाळीचे देखील साफसफाईचे काम पूर्ण झालेले आहे. तसेच उर्वरीत शहरातील गटारे व व्‍हाळींची साफसफाई पावसाळयापूर्वी पूर्ण करण्‍यात येणार आहेत. सर्व शहरातील गटारे/व्हाळी साफसफाई पूर्ण झाल्यानंतर शहरामध्ये डास फवारणी करण्यात येणार आहे. तसेच पावसाळयाच्‍या कालावधीत उद्भवणाऱ्या आपत्ती निवारणासाठी कणकवली नगरपंचायत मध्ये आपत्‍ती व्‍यवस्‍थापन कक्ष स्‍थापन करण्‍यात येणार आहे. त्‍याचप्रमाणे कणकवली शहरातील ज्‍या इमारती धोकादायक झालेल्‍या आहेत त्‍या मिळकतधारकांना नोटिसा नगरपंचायतीने बजाविलेल्‍या आहेत त्‍यांनी बजाविणेत आलेल्‍या नोटीसीनुसार कार्यवाही करुन तशी माहिती नगरपरिषदेस देण्‍यात यावी रस्‍त्‍याने जाणा-या येणा-या नागरीकांचे जिवितास कोणताही धोका पोहोचणार नाही याची दक्षता घ्‍यावी व नगरपरिषदेस सहकार्य करावे. याकामी संबंधित नागरीकांनी वेळीच दक्षता न घेतल्‍यास कोणतीही वित्‍तीय जिवितहानी झाल्‍यास त्‍यास नगरपरिषद जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्‍यावी तसेच शहरातील रहदारीच्‍या ठिकाणी व रस्‍त्‍यांलगत सार्वजनिक मालकीच्‍या जागेमध्‍ये किंवा वैयक्तिक मालकीच्‍या जागेमध्‍ये जी धोकादायक झाडे असतील, ती झाडे महाराष्‍ट्र (नागरी क्षेत्रे) झाडांचे संरक्षण व जतन (सुधारणा) अधिनियम २०२१ अन्‍वये या कार्यालयाची रितसर परवानगी घेऊन संबंधितांनी तोडून घ्‍यावीत अन्‍यथा अशा धोकादायक झाडांमुळे किंवा झाडांच्‍या फांद्यांमुळे कोणत्याही प्रकारची जिवित व वित्‍तहानी झाल्‍यास संबंधित जागा मालक / झाड मालक जबाबदार राहतील. यामुळे होणा-या दुर्घटनेस कणकवली नगरपंचायत जबाबदार राहणार नाही याची गंभीरपणे नोंद घ्‍यावी अशा सुचना नगरपंचायत प्रशासनातर्फे स्‍था‍निक वृत्‍तपत्रामध्‍ये प्रसिद्ध करण्‍यात आलेली आहे.
कनिष्ठ अभियंत, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी यांजकडे कणकवली शहरातील विद्युत पोल व वाहिन्यांची पहाणी करून सुस्थितीत असल्याचे खात्री करून घेणे तसेच विद्युत पोल समोरील वाढलेल्या फांद्या कटींग करण्याबाबत पत्राद्वारे कळविण्यात आले आहे. तसेच अतिवृष्टी मुळे उन्मळून पडलेल्या वृक्षांची तोडकाम करण्यासाठी वुड कटर मशीन व इतर साहित्य अद्यावत ठेवणेबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. पावसाळ्यात निर्माण होणा-या पुर स्थिती नियंत्रणाकरीता आपत्कालीन कर्मचा-यांसहित जे.सी.बी., ट्रक्टर व इतर अनुषंगिक साहित्य अद्यावत ठेवणेबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत.
पावसाळी साथरोग नियंत्रणाकरीता भंगारवाले, नवीन बांधकाम चालू असलेले बांधकाम व्यवसायिक व इतर राज्यातून आलेले कामगार यांना साथरोगाबाबत सूचनांचे पत्र देणेबाबत व आरोग्य तपासणी करणेबाबत योग्यती कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पावसाळ्यात साचलेल्या पाण्यात डास उत्पत्ती होऊ नये म्हणून अ‍ॅबीटींग व डास फवारणी करण्याबाबतचे नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या. पावसाळ्या पुर्वी पाणी शुध्दीकरण्याकरीता नगरपंचायत हद्दीतील सार्वजिक विहिरींमध्ये टी.सी.एल. टाकाणे व पावसाळ्यापूर्वी नळ पाणीपुरवठा शुध्दीकरणाकरीता टी.सी.एल.चा साठा करून ठेवणेबाबत सूचना देण्यात आल्या. तसेच आपत्ती व्यवस्थापनाबाबत कर्मचा-यांना प्रशिक्षण देण्याबाबत सूचना देण्यात आल्या असे नियोजन कणकवली नगरपंचायतीचे मुख्याधिकारी श्री.परितोष कंकाळ यांनी केले आहे.

error: Content is protected !!