रस्त्यावरील निराधार वंचितांसाठीच्या कार्याला सहाय्य हेच परमेश्वर प्राप्ती व पुण्याचे कार्य आहे……प्रदिप दळवी, अध्यक्ष, बाल गोपाळ मंडळ , श्री श्रध्दास्थान गणेश मंदिर -अंधेरी

बाल गोपाळ मंडळ , श्री. श्रध्दास्थान गणेश मंदिर कडून जीवन आनंद संस्थेस जीवनावश्यक वस्तूंचे सहाय्य

सहार पी.अँण्ड टी.काँलनीतील रहिवाशांचे वंचित निराधार बांधवांसाठी महत्वाचे योगदान

” जीवन आनंद संस्थेचे कार्यकर्ते रस्त्यावरील निराधार वंचित बांधवांच्या सेवेचे मानवतेचे कार्य करीत आहे. या कार्याला सहाय्य करणे हेच परमेश्वराचे आशिर्वाद प्राप्तीसाठीचे व पुण्याचे कार्य आहे” असे प्रतिपादन बाळ गोपाळ मंडळाचे अध्यक्ष प्रदिप दळवी यांनी केले. अंधेरी येथील सहार पी अँण्ड टी काँलनीतील श्री श्रध्दास्थान गणेश मंदिर येथे बाळ गोपाळ मंडळाच्या माध्यमातून जीवन आनंद संस्थेच्या आश्रम आणि शेल्टर होममधील बांधवांसाठी किराणा साहित्य व आर्थिक देणगी देवून सहाय्य केले.

 श्री.श्रध्दास्थान गणेश मंदिर हे सहार पी अँण्ड टी काँलनीतील रहिवाशांसाठी श्रध्देचे ठिकाण आहे. हे मंदिर आणि मंदिराशी संलग्न बाल गोपाळ मंडळ संस्थेच्या माध्यमातून विविध समाजोपयोगी कार्यक्रम उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असते.मंडळाचे यंदाचे  हे ५० वे वर्ष सुरू आहे. श्री. श्रध्दास्थान गणेश मंदिर व बाळ गोपाळ मंडळ संस्थेच्या सुवर्णमहोत्सवी वाटचालीत श्री.गणेशाचे आशिर्वाद आणि कृपेने आजवर अनेक संकटे आणि आव्हानांचा सामना केला.व संस्थेचे धार्मिक व सामाजिक हिताचे कार्य आजवर अव्याहत सुरू ठेवले असल्याबाबत जगदिश पवार यांनी माहिती दिली. 
    जीवन आनंद संस्थेच्या आश्रम आणि शेल्टर होममधील बांधवांसाठी काँलनीतील रहिवाशी, मंडळाचे  सभासद व भक्त मंडळींनी संकलित केलेले साहित्य प्रदान करण्यासाठी एका छोटेखानी कार्यक्रमाचे मंदिरात आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी श्री दळवी हे कार्यक्रमाचे प्रास्ताविकात बोलत होते. किसन चौरे यांनी जीवन आनंद संस्थेच्या रस्त्यावरील निराधार वंचितांसमवेतच्या कार्याबद्दल संक्षिप्त माहिती दिली.  बाल गोपाळ मंडळाचे हरियान बुवा यांनी आपले विचार मांडले.

   कार्यक्रम संयोजनात जगदिश पवार , रूषभ कालकर, गणपत हरियान बुवा , सिध्देश शिंदे यांची महत्वाची भुमिका होती. तर पोस्ट आणि डाक समाजकल्याण केंद्र असोशिएशनचे अध्यक्ष विश्वनाथ कांबळी, खजिनदार श्री.दळवी यांचेसह  तृप्ती व संतोष नाडकर्णी, ए.एस.पवार, संभाजी जाधव, सौरभ कालकर, अजय चव्हाण, तेजस चोपडेकर, संतोष पळसमकर,विराज वायकर, ओंकार पांगे, लक्ष्मण येरम, समीर सावंत, श्रध्दा लाड , स्नेहा लाड ,उर्मिला चव्हाण, संतोष जिल्ला कल्पेश रेवाळ यांची यावेळी प्रमुख उपस्थीती होती. जीवनावश्यक वस्तू व आर्थिक सहाय्य चेक किसन चौरे व जीवन आनंद संस्थेचे युवा कार्यकर्ते राहुल देशमुख यांचेकडे सुपूर्द करण्यात आले.

दरम्यान जीवन आनंद संस्थेचे अध्यक्ष संदिप परब यांनी सहार पी अँण्ड टी काँलनीतील रहिवाशी, बाल गोपाळ मंडळ सभासद व गणेश भक्त मंडळींच्या योगदानाबद्दल धन्यवाद दिले असून मंडळाच्या सुवर्णमहोत्सवी वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

किसन चौरे,कोकण नाऊ

error: Content is protected !!