कोटकामते येथील योगेश पोकम यांचा प्रामाणिकपणा

रस्त्यात मिळालेले दिड तोळ्याचे सोन्याचे ब्रेसलेट दिले मालकाला परत
आचरा–अर्जुन बापर्डेकर आचरा देवगड रस्त्यावर 28एप्रिल रोजी मोटरसायकलने आपल्या कुटूंबासमवेत लग्नाला जात असलेले पोयरे गादववाडी येथील सुरेंद्र रुपये यांचे दिड तोळ्याचे सोन्याचे ब्रेसलेट इळये पाटथर येथे रस्त्यावर पडले होते.त्याच रस्त्यावरुन जाणारे पोकम यांना ते सापडले होते. याबाबत सोशल मिडीया वरुन या
मिळालेले ब्रेसलेट रुपये यांचे असल्याचे समजल्यावर त्यांनी त्यांच्या शी संपर्क साधून ब्रेसलेट त्यांचेच असल्याची खात्री करून त्यांना परत केले. त्यांच्या प्रामाणिकपणा बद्दल सुरेंद्र रुपये यांनी त्यांना रोख पाच हजार रुपये देवून त्यांचा गौरव केला. त्यांच्या प्रामाणिकपणा बद्दल पोकम यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.





