देवगड तालुक्यातील गोवळ गावातील उ.बा.ठा चे उपसरपंच सत्यवान जंगले यांचा जय महाराष्ट्र करून भाजप पक्षामध्ये प्रवेश

आमदार नितेश राणे यांच्या गोवळ गावातील चालू असलेल्या विकास कामांचा धडाका बघून पक्षप्रवेश
देवगड तालुक्यातील गोवळ मधील उबाठाचे कार्यकर्ते चंद्रकांत जंगले, सत्यवान जंगले, रुपेश जागळी, विजू जंगले, दिनेश कोकरे, सत्यवान तेली यांनी आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपचा झेंडा हाती घेतला आहे. आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली काम करायचे ठरवलं असून त्यामुळे गोवळ गावातील ठाकरे गटाला हा मोठा धक्का मानला जातो आहे.
यावेळी आमदार नितेश राणे बंड्या नारकर, उदय पाटील, पंढरी वायंगणकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
कणकवली प्रतिनिधी





