ठाकरेंची सभा सुरू असतानाच शिवसैनिकांचा भाजपमध्ये ओम गणेश बंगल्यावर प्रवेश

आमदार नितेश राणेंनी केले प्रवेशकर्त्यांचे स्वागत
ठाकरेंचा करिष्मा कणकवली मतदारसंघात चालेना
कणकवलीत उबाठा सेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा सुरू असताना उबाठा सेनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी ओम गणेश निवासस्थानी आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत पक्ष प्रवेश केला. एकीकडे जाहीर सभा तर दुसरीकडे जाहीररीत्या पक्षप्रवेश असे चित्र आज कणकवलीत पहावयास मिळाले. तोंडवली बावशी बोभाटेवाडी येथील शिवसैनिकांनी हा पक्षप्रवेश केला.
भाजप मध्ये प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांमध्ये,ज्ञानेश्वर मोर्ये, सत्यवान मोर्ये, विठ्ठल मोर्ये , प्रमोद मोर्ये, चंद्रकांत बोभाटे, स्नेहा मर्ये, संजना मर्ये, मनिप्पा आवळे, सदानंद आवळे, पूर्वा मर्ये, सौरभ बोभाटे राजेश बोभाटे प्राजक्ता मर्ये समता मर्ये आदी शिवसैनिकांचा समावेश आहे.
कणकवली प्रतिनिधी





