वारगाव येथे महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांचा प्रचार सुरु..

महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचाराला वारगाव मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

केंद्रीय मंत्री आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचाराला वारगाव येथे सुरुवात झाली असून भाजपा वारगाव विभागाच्या वतीने वार गावमध्ये महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रचाराचे नियोजन करण्यात आले असून विभागातील सर्व गावांमध्ये घरोघरी प्रचार करण्यास सुरुवात झाली आहे. वारगाव येथील धूमक वाडी, पवार वाडी, मांडवकर वाडी, धावडे वाडी येथे प्रचार करून झाला असून येथील लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळतं असल्याचे सांगण्यात येतं आहे. त्यामुळे वारगाव येथे नारायण राणे यांच्या प्रचाराला उत्साहात प्रचाराला सुरुवात झाली आहे ..भाजपा चे कार्यकर्ते घरोघरी जाऊन मतदारांच्या भेटी घेऊन नारायण राणे यांचा प्रचार करत आहेत.
यावेळी माजी महिला बालकल्याण सभापती -रत्नप्रभा वळंजु,सरपंच -नम्रता शेट्ये,उपसरपंच -नाना शेट्ये, सदस्य -दिलीप नावळे, राजा जाधव, कुलकर्णी, कविता शेट्ये, याच्यासह
सर्व भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते,ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अस्मिता गिडाळे, खारेपाटण

error: Content is protected !!