खारेपाटण येथे महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांचा झंझावती प्रचार सुरु

खारेपाटण शिवसेना जि. प संपर्क प्रमुख सतीश गुरव यांच्या उपस्थितीत खारेपाटण येथील मतदारांच्या भेटीगाठी सुरु
मतदारांकडून विनायक राऊत यांच्या प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद
रत्नागिरी -सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुकीचे शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) व महाविकास आघाडी चे उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारासाठी खारेपाटण विभागात सुरुवात झाली असून,खारेपाटण शिवसेना जि. प संपर्क प्रमुख सतीश गुरव यांच्या उपस्थितीत प्रचार होतं असून यावेळी मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याचे सांगण्यात आले.घरोघरी जाऊन मतदारांच्या भेटी घेऊन त्यांना मतदारांकडे मशाल निशाणी पोचवण्यासाठी शिवसेनेचे पदाधिकारी व आघाडीचे कार्यकर्ते प्रयत्न करत आहेत.यावेळी खारेपाटण शिवसेना जि. प संपर्क प्रमुख सतीश गुरव,उपतालुका प्रमुख-महेश कोळसुलकर, युवा सेना उपतालुका प्रमूख- तेजस राऊत,शाखा प्रमूख- दिगंबर गुरव,खारेपाटण शहर प्रमूख -संतोष गाठे,संतोष पराडकर दिनकर गांधी, भूषण कोळसुलकर, रमेश गुरव, गजानन राऊत याच्यासह शिवसेने चे(उध्दव बाळासाहेब ठाकरे) सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते प्रचाराच्या रिंगणात उतरून लोकसभा निवडणुकीचे उमेदवार विनायक राऊत यांचा प्रचार करीत आहेत.
अस्मिता गिडाळे, खारेपाटण