पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अपेक्षित असलेली नीलक्रांती साकारण्यासाठी श्री.नारायणराव राणे यांना मतदान करा

मच्छीमार आणि मत्स्य व्यावसायीक यांना आवाहन
मालवण (प्रतिनिधी) – कोकणच्या मच्छीमार आणि मत्स्य व्यावसायिक यांच्या भल्यासाठी नारायण राणे यांचे सारखे मजबूत नेतृत्व केंद्रात जाणे आवश्यक आहे यासाठी मच्छीमार बांधवांनी आणि मत्स्यव्यवसायिकांनी भाजपच्या पाठीमागे उभे राहावे नारायण राणे यांना विजयी करावे असे भाजपच्या मच्छीमार सेलचे अध्यक्ष विकी तोरसकर यांनी आवाहन केले आहे
विकी तोरसकर यांनी म्हटले आहे की सन२०१४ ते २०२४ या कालावधीत भारतातील ८२०० किलोमीटरची किनारपट्टी तसेच मत्स्यपालन या क्षेत्राला बळ देण्यासाठी सन २०१४ ते २०१९ नीलक्रांती ही योजना तर २०२१ पासून पुढे प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना राबविण्यात येत आहे .सदर योजनांमध्ये मत्स्य व्यवसाय बरोबरच मच्छीमाराला राहती घर, बंदी कालावधीतील अनुदान ,मासेमारी जाळी, नौका सक्षमीकरण ,वाहतूक व्यवस्था साठी इन्सुलिटेड व्हॅन प्रक्रिया उद्योग ,बर्फ कारखाने त्याचबरोबर खोल समुद्रातील मासेमारी असे प्रकारच्या अनेक योजनांचा समावेश आहे. त्याचा लाभ हजारो लाभार्थ्यांनी घेतला आहे. तसेच मत्स्य पालन करणाऱ्या मत्स्य शेतकऱ्यांसाठी सुद्धा विविध योजना मोदी सरकारने गेल्या दहा वर्षात राबविले आहेत. ४०ते ६० टक्के पर्यंत अनुदान एवढं भरघोस अनुदान लाभार्थी यांना गेल्या दहा वर्षांमध्ये मिळालेले आहे. त्याचबरोबर मत्स्य व्यवसायासाठी आवश्यक पायाभूत सोयी सुविधांचा विकास सदर योजनेमध्ये केलेला आहे.वीस हजार कोटी रुपयांची तरतूद या पाच वर्षासाठी मोदी सरकारने केली होती .त्याचा पुरेपूर फायदा मत्स्य व्यवसायाला होत आहे. भारतीय जनता पार्टीच्या जाहीरनाम्यामध्ये प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना ची व्याप्ती वाढवण्यासंदर्भात आश्वासन दिले आहे. याचा फायदा अनेक मत्स्यव्यवसायिक लाभार्थी यांना होणार आहे. रत्नागिरी -सिंधुदुर्ग चा विचार केला असता अनेक लाभार्थी यांनी याचा लाभ घेतला आहे. त्यामध्ये बर्फ कारखाने, यांत्रिक नौका सक्षमीकरण, पारंपारिक नौका, जाळी खरेदी, मत्स्यपालन क्षेत्र, मत्स्य सेवा केंद्र व इतर अनेकविध योजनांचा समावेश आहे ,आज मीतीस सदर योजनेच्या अंतर्गत*** कोटी रुपयाचे प्रस्ताव मंजूर झालेले आहेत आणि काही प्रस्ताव प्रलंबित आहेत. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग यांना लाभलेला विस्तीर्ण समुद्रकिनारा आणि मुबलक पाण्याची व्यवस्था यासाठी प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना अतिशय उत्कृष्टपणे राबवण्याचे श्रेय माननीय पंतप्रधान यांच्या संकल्पनेतून निर्माण झालेल्या सागर मित्र यांच्या माध्यमातून होत आहे .भविष्यातील मत्स्य व्यवसायाच्या प्रगतीसाठी प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना याची व्याप्ती वाढण्याची गरज आहे आणि त्यासाठी भारतीय जनता पार्टीला निवडून आणावे असे आवाहन करीत आहे. सदर योजनेचा केंद्रीय स्तरावर पाठपुरावा करण्यासाठी माननीय नारायण राणे साहेब यांच्यासारखा प्रशासनावर पकड आणि मत्स्यव्यवसाय ची पुरेपूर जाण असलेल्या नेत्याची लोकसभेमध्ये जाण्याची गरज आहे. यासाठी सर्व मच्छीमार बांधव भगिनी ,मत्स्यव्यवसायिक, मत्स्य पालक यांना विनंती करीत आहे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अपेक्षित असलेली नीलक्रांती प्रत्यक्षात आणण्यासाठी नारायण राणे स यांना रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून मतदार संघातून भरघोस मतांनी निवडून द्यावे असे आवाहन भाजपच्या मच्छीमार सेलचे नेते रविकिरण तोरस्कर यांनी केले आहे