कणकवली गडनदी पात्रातील जॅकवेल कडील गाळ उपसा करण्याचे काम सुरू

उद्या शिवडाव धरणाचे पाणी नदीपात्रात सोडणार
उन्हाळ्यातील कणकवलीचा पाणी प्रश्न मिटणार
मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांची माहिती
कणकवली कनकनगर येथील नगरपंचायत नळ योजनेच्या जॅकवेल जवळील नदीच्या कोंडीमधील गाळ
उपसा करण्याचे काम शनिवार पासून सुरु करण्यात आले आहे. सदरचा गाळ उपसा करण्याकरीता 3 जे.सी.बी. व 3 डंपर कार्यान्वित असून युद्धपातळीवर गाळ उपसा करण्याचे काम सुरु आहे. नदी पात्रातील गाळ उपसा करण्यात येत असल्याने कोंडीची पाणी साठवण्याची क्षमता चांगल्या प्रकारे वाढत आहे. कणकवली नगरपंचायतीने लघु पाटबंधारे विभाग, ओरोस, सिंधुदुर्गनगरी यांजकडे शिवडाव धरणातील पाणी गडनदी पात्रात सोडण्याबाबतचे मागणीपत्र दिले असून त्यानुसार लघु पाटबंधारे विभागाचे अधिकारी श्रीमती शिंदे यांजकडून जॅकवेल जवळील नदीच्या कोंडीमधील पाणीसाठ्याची पाहणी करण्यात आली. व दिनांक 1 मे रोजी धरणातील पाणी नदीपात्रात सोडण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे कणकवली शहराला पाणी पुरवठा मे महिन्यामध्ये सुरळीतपणे सुरु राहणार आहे. अशी माहिती नगरपंचायत चे मुख्याधिकारी पारितोष ककाळ यांनी दिली.
कणकवली प्रतिनिधी