शिवसेना कणकवली विधानसभा प्रमुख संदेश पटेल यांनी खारेपाटण येथे प्रचाराचा घेतला आढावा

राणेंच्या प्रचाराला खारेपाटण मध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद

शिवसेना विधानसभा प्रमुख संदेश पटेल युवासेना जिल्हाप्रमुख सुकात वरूनकर यांनी खारेपाटण येथे महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचाराचा आढावा घेतला. यावेळी त्यानी शिवसेना कार्यकर्त्यांना सूचना दिल्या. व भाजपाच्या पदाधिकाऱ्यां सहीत प्रचारात सहभागी झाले. या वेळी तालुका प्रमुख शरद वायंगणकर उप तालुका प्रमुख मंगेश गुरव कृषी समिती सदस्य मंगेश ब्रम्हडांदे यांच्या सह सरपंच प्राची इस्वलकर व ग्राम. प . सदस्य गुरुप्रसाद शिंदे अस्थळी पवार यांच्या सह शिवसैनिक व भाजपा पदाधिकारी ग्रामपंचायत सदस्य हे खारेपाटण येथे प्रचारात सहभागी झाले होते. खारेपाटण येथे महायुतीला अनुकूल वातावरण असून चांगले मताधिक्त मिळेल असे यावेळी विश्वास सर्वांनी व्यक्त केला.

कणकवली प्रतिनिधी

error: Content is protected !!