दारिस्ते बौद्धवाडीत पाणीपुरवठयासाठी संदेश सावंत यांचा पुढाकार

स्वखर्चाने दिला 15 हजारांचा पाईप;लोकांची पाणी टंचाई ची गैरसोय केली दूर

सध्या च्या उन्हाळ्यात उष्मावाढिने लोकं अक्षरशः हैराण झाली आहेत. त्यातच काही ठिकाणी तर पाणी टंचाई ची समस्या देखील वाढत आहे, कणकवली तालुक्यातील दारिस्ते बौधवाडी येथील लोकांना देखील पाणी टंचाई चा सामना करावा लागत आहे. एकिकडे उष्मावाढ आणि दुसरीकडे पाणी टंचाई असा सामना येथील लोकं करत आहेत.दारिस्ते बौद्ध वाडी येथे संध्या अती उष्णते मुळे पाण्याची टंचाई शी सामना करत असल्यांचे समजताच माजी जिल्हा परिषद अध्यक्ष गोट्या सावंत यांनी तात्काळ समस्या जाणून घेत, 15000 हजार रक्कमेचा 300मीटर लांबीचा पाईप देऊन बौध्दवाडी येथे जाग्या वरती पाणी नेऊन दिले आहे. त्यामुळे बौध्द वाडीतील लोकांची पाण्याची होणारी गैरसोय दूर केल्यामुळे दारिस्ते बौध्द वाडीतील ग्रामस्थांनी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष गोट्या सावंत यांचे मनापासून आभार मानत समाधान व्यक्त केले.या वेळी दारिस्ते सरपंच सानिका गांवकर,संजय सावंत दारिस्ते उपसरपंच, माजी उपसरपंच संजय गांवकर यांनी गोट्या सावंत यांच्या माध्यमातून बौध्द वाडी पर्यंत पाणी पोचवण्यासाठी प्रयत्न केले.या वेळी बौध्दवाडीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अस्मिता गिडाळे, खारेपाटण

error: Content is protected !!