कुरंगवणे गोठणकरवाडी येथे नारायण राणे यांचा प्रचार सुरु

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुकीचे उमेदवार नारायण राणे यांचा कुरंगवणे गोठणकर वाडी येथे प्रचार सुरु करण्यात आला असून कार्यकर्ते मोठ्या मेहनतीने उन्हातन्हातून लोकांच्या भेटी घेऊन, घरोघरी जाऊन प्रचार करीत आहेत. यावेळी माजी जिल्हा परिषदेचे वित्त आणि बांधकाम सभापती -बाळा जठार साहेब, पंचायत समितीचे माजी सभापती- दिलीप भाई तळेकर , रविंद्र लाड , सरपंच पप्पु ब्रम्हदंडे, उपसरपंच बबलु पवार, बुथ अध्यक्ष संजय लाड , भाजपचे कार्यकर्ते नारायण कदम, पांडुरंग गोठणकर, दिनकर गोठणकर, गणेश गोठणकर उपस्थित होते. नारायण राणे यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करणार असल्याचा विश्वास यावेळी सर्व भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते यांनी व्यक्त केला आहे.
अस्मिता गिडाळे, खारेपाटण