आचरा येथे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रचाराचा शुभारंभ

रामेश्वर चरणी श्रीफळ अर्पूण प्रचाराला सुरुवात
दत्ता सामंत,आबिद नाईक यांची प्रमुख उपस्थिती
रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातील महायुतीचे लोकप्रिय उमेदवार नारायण राणे यांच्या आचरा येथील प्रचाराचा शुभारंभ भाजप नेते दत्ता सामंत, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अबिद नाईक,बाळू कुबल यांच्या प्रमुख उपस्थितीत रामेश्वर चरणी श्रीफळ अर्पण करुन करण्यात आला. आचरा विभागातून राणे यांना मोठे मताधिक्य मिळवून देण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.
यावेळी आचरा सरपंच जेरान फर्नांडीस, वायंगणी सरपंच रुपेश पाटकर, भारतीय जनता पार्टीचे राजन गांवकर, निलीमा सावंत, संतोष कोदे, संतोष गांवकर, जयप्रकाश परुळेकर,चिंदर उपसरपंच दिपक सुर्वे,आचरा उपसरपंच संतोष मिराशी, ग्रा प सदस्य मुझफ्फर मुजावर, मंदार सांबारी,अभय भोसले,सचिन हडकर,नाथ मालंडकर,माजी उपसरपंच पांडूरंग वायंगणकर,वामन आचरेकर,डॉक्टर प्रमोद कोळंबकर, लवू मालंडकर,बाबू कदम,उदय घाडी,लवू मालंडकर, महेंद्र घाडी, रुपेश हडकर,वाघ काका, पंकज आचरेकर, अभिजित सावंत,उदय पुजारे, सारंग,श्रीपाद सावंत यांसह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी आचरा देवूळवाडी येथील सांबारी ,गुरव यांच्या घरी भेट देवून प्रचाराला सुरवात केली गेली.
आचरा, अर्जुन बापर्डेकर