राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांच्या नारायण राणे यांच्या प्रचारासाठी कुडाळ तालुक्यातील गावांमध्ये बैठका

कुडाळ तालुक्यातील कूपवडे पंचक्रोशीतील जनतेशी बैठक घेऊन साधला संवाद

राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी महायुतीचे लोकसभा उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी संघटने सहित आपण स्वतः प्रचाराचा झंझावात चालू केला आहे. आज देवगङ ,मालवण,तालुक्यासह कुडाळ तालुक्यातील कुपवडे पंचक्रोशीतील जनतेशी संवाद साधला कुपवडे येथील राष्ट्रवादी पदाधिकारी बंटी परब यानी या बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत लोकांच्या व कार्यकर्ते यांच्या अडचणी समजून घेण्यात आल्या व या निवडणुकीत महायुतीचे लोकसभा उमेदवार आदरणीय नारायण राणे हे प्रचंड मताधिक्याने निवडून येतील असा विश्वास देण्यात आला. त्यावेळी बंटी परब, राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष सुभाष सावंत, राष्ट्रवादी प्रांतिक सदस्य विलास गावकर,जिल्हा प्रतिनिधी निशिकांत कडूलकर, जिल्हा प्रतिनिधी गणेश चौगुले, जिल्हा प्रतिनिधी केदार खोत व राष्ट्रवादी कार्यकर्ते उपस्थित होते.

कणकवली प्रतिनिधी

error: Content is protected !!