महायुतीचे उमेदवार नारायण राणेंना कणकवली शहरातून मोठे मताधिक्य देणार!

माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांची माहिती

कणकवली शहरात राणेंच्या प्रचाराचा धडाका

महायुतीचे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार व केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मोठया मताधिक्याने विजयी करण्यासाठी कणकवली शहर भाजपच्या कार्यकर्त्यांनी कंबर कसली असून, नारायण राणे यांना कणकवली शहरातून लीड देणार असल्याची माहिती माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली. कणकवली शहरात आज महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारार्थ प्रचार फेरी काढण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते. घरोघरी प्रचार पत्रके वाटत नारायण राणे यांना मतदान करा पर्यायाने नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान होण्यासाठी व सिंधुदुर्गाच्या विकासासाठी भविष्यात राणे पुन्हा केंद्रीय मंत्री होण्यासाठी ही संधी दवडू नका असे आवाहन मतदारांना भाजपा कडून करण्यात आले. यावेळी कणकवली बाजारपेठेपासून पटवर्धन चौकापर्यंत अनेक भागांमध्ये घरोघरी प्रचार करण्यात आला. यावेळी माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, राजश्री धुमाळे, शहराध्यक्ष अण्णा कोदे, सुप्रिया नलावडे, कंजूमर सोसायटी चेअरमन संदीप नलावडे, पंकज पेडणेकर, निखिल आचरेकर, राज नलावडे, राजा पाटकर आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दिगंबर वालावलकर, कणकवली

error: Content is protected !!