इंडिया आघाडीचे उमेदवार खासदार विनायक राऊत यांच्या प्रचाराची साकेडीत फेरी

साकेडी गावामधून प्रचार फेरीला उस्फूर्त प्रतिसाद

खासदार विनायक राउतांना मताधिक्य देण्यासाठी प्रयत्न करणार पदाधिकाऱ्यांची ग्वाही

रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचे इंडिया आघाडीचे उमेदवार खासदार विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ आज कणकवली तालुक्यातील साकेडी गावामध्ये प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. साकेडी मधील श्री पावनादेवी मंदिरामध्ये प्रचाराचा नारळ फोडत खासदार विनायक राऊत यांना पुन्हा एकदा मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याबाबत निर्धार केला. यावेळी शिवसेना शाखाप्रमुख संदीप राणे, युवासेना विभाग प्रमुख किरण वर्दम, माजी शाखाप्रमुख मुरारी राणे, तुकाराम ढवण, भास्कर दळवी, सागर गुरव, तेजस वर्दम, सुनील घाडी, प्रसाद घाडी, अनंत सापळे, मजीद शेख, इक्बाल शेख, प्रेम डीसोजा, विठ्ठल वर्दम, सुरज वर्दम, अनंत पाटील, आदी उपस्थित होते.

कणकवली, प्रतिनिधी

error: Content is protected !!