खारेपाटण येथे शिवसेनेची कॉर्नर सभा संपन्न…

“उद्धवजींना रोखण्याची हिम्मत कुठल्याही नाच्याकडे नाही…– विनायक राऊत

खारेपाटण शिवसेना शाखा कार्यालयाजवळ शिवसेना पक्षाचे नेते व खासदार विनायक राउत यांच्या प्रचारार्थ महाविकास आघाडीची कॉर्नर सभा आज बुधवारी दी.२४ एप्रिल २०२४रोजी सकाळी ११.३० वाजता घेण्यात आली.
“मोदी – शहा हे सरकार भारतीय लोकशाही स्वातंत्र्यावर घाला घालण्याचे काम करत आहेत.परंतु हे रोखण्याची ताकद आम्हाला भारतीय संविधानाने दिली आहे. देशातील जनता आता त्यांच्या या फसव्या कुटू नीतीला भिक घालणार नाही.तर उद्धवजीना रोखण्याची हिम्मत आता कुठल्याही नाच्याकडे राहीलेली नाही. अशी जोरदार टीका रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे शिवसेना पक्षाचे व महविकास आघाडीचे उमेदवार खासदार विनायक राउत यांनी खारेपाटण येथे आयोजित करण्यात आलेल्या महविकास आघाडीच्या कॉर्नर सभेत केद्रीय मंत्री तसेच ते भाजप पक्षाचे लोकसभेचे रत्नागिरी – सिंधुदुर्ग मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांचे नाव न घेता जोरदार टीका केली.
खारेपाटण शिवसेना शाखा कार्यालयाजवळ शिवसेना पक्षाचे नेते व खासदार विनायक राउत यांच्या प्रचारार्थ माहविकास आघाडीची कॉर्नर सभा आज बुधवारी दी.२४ एप्रिल २०२४रोजी सकाळी ११.३० वाजता घेण्यात आली.यावेळी
शिवसेना उपनेत्या संजना घाडी,गौरीशंकर खोत,शिवसेना जिल्हा प्रमुख संदेश पारकर माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, सिंधुदुर्ग जिल्हा संपर्क प्रमुख अरुण दूधवडकर,अल्पसंख्यक समाजाचे प्रतिनिधी रज्जाकभाई रमदुल, सामाजिक कार्यकर्ते संदीप कदम,
महिला जिल्हा प्रमुख नीलम पालव,युवा सेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक,कणकवली विधानसभा संपर्क प्रमुख अतुल रावराणे,काँग्रेस कार्यकर्ते नागेश मोरये,प्रवीण वरूनकर,राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते सुधाकर कर्ले,आप पक्षाचे कार्यकर्ते विवेक ताम्हणकर कणकवली महिला तालुका प्रमुख वैदही गुडेकर,तालुका प्रमुख कन्हैया पारकर,विधासभा प्रमुख सचिन सावंत,कणकवली उप तालुका प्रमुख महेश उर्फ गोट्या कोळसुलकर,महिला विभाग प्रमुख अंजली पांचाळ,विभाग प्रमुख दया कुडतरकर,युवा कार्यकर्ते तेजस राऊत आदी मान्यवर प्रमुख पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
यावेळी खारेपाटण शिवसेना विभागाच्या वतीने खासदार विनायक राऊत यांचे श्री गोट्या कोळसुलकर यांनी पक्षाचे चिन्ह असलेली पेटती मशाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.यावेळी बोलताना शिवसेना उपनेत्या संजना घाडी यांनी भाजप पक्षावर जोरदार टीका करत भ्रष्ट जनता पार्टी या देशातून हद्दपार करण्याची ही वेळ आली असून अब की बार भाजप तडीपार अशी घोषणा देत.खासदार विनायक राउत याना पुन्हा एकदा लोकसभेत निवडून देण्याचे आव्हान त्यांनी येथील जनतेला केले.यावेळी शिवसैनिक श्री महेश रघुनाथ भोगले यांची वाघाचीवाडी तळेरे शाखा प्रमुख म्हणून तर श्री आदित्य महाडिक यांना युवा सेना तळेरे शहर प्रमुख म्हणून नियुक्ती पत्रे खासदार विनायक राउत यांच्या शूभहस्ते देण्यात आली.
यावेळी बोलताना खासदार राऊत पुढे म्हणाले मी काय केले ? म्हणून मला प्रश्न विचारणा करणाऱ्या राणेंनी आदी स्वतःला प्रश्न विचारावा.मी काय केले.? विकासाच्या नावावर येथील जनतेची फसवणूक करून स्वतःची घरे भरण्याचे काम आजपर्यंत त्यांनी केले.मी काहीच नाही केले परंतु स्वतःच्या स्वर्थसाठी दुसऱ्यांचे राजकीय बळी घेत या जिल्ह्याला गुंडाचा दहशत वाद्यांचा जिल्हा म्हणून ओळख निर्माण करून दिलीत.
उद्धव साहेबाना धमकी देता.तर मग काही दिवसातच उद्धव साहेब कणकवलीत येत आहेत.तेव्हा कुठल्यातरी कोनाड्यात बसून त्यांचे भाषण ऐका.तुमच्या पापाचे घडे आता भरले आहेत.ते त्यांच्या विचारातून ऐका.आणि किमान आपले डीपॉझिट तरी संभाळा असा इशारा महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राउत यांनी विरोधी उमेदवार नारायण राणे यांना दिला.
सिंधुदुर्गात आपण उद्धव ठाकरे व राजेश टोपे यांच्या प्रयत्नाने शासकीय मेडिकल आणले.विशेष हत्ती मोहीम राबवून शेतकऱ्यांचे होणारे नुकसान वाचविले,मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्ग आणण्यासाठी प्रयत्न केला.चीपी विमानतळ व्हावे म्हणून प्रयत्न केले. तर राणेंनी आजपर्यंत फक्त आणि फक्त आपल्या कुटुंबासाठी राजकारणातून सत्ताकारण सांभाळण्याचे काम केले.त्यामुळे राणे यांच्या पराभवाची हॅट्रिक साधण्याची संधी सोडू नका.असे देखील आवाहन विनायक राऊत यांनी यावेळी जनतेला केले.
महाविकास आघाडीच्या वतीने खारेपाटण – तळेरे विभागातील गावातील नागरिकांची घेण्यात आलेल्या या कॉर्नर सभेला मोठ्या संख्येने नागरिक व शिवैनिक पदाधिकारी उपस्थित होते.

अस्मिता गिडाळे, खारेपाटण

error: Content is protected !!