मसुरे चांदेरवाडी येथे २५ पासून धार्मिक कार्यक्रम!

पुणे येथील कीर्तनकार ह.भ.प. केशव महाराज मुळीक यांचे २६ रोजी कीर्तन
मसुरे | प्रतिनिधी– मसुरे चांदेरवाडी येथे २५ ते २८ एप्रिल या कालावधीत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.
२५ एप्रिल रोजी श्री ब्राह्मणदेव लघुरुद्र,
२६ एप्रिल रोजी श्री कुळाचार मंदीर प्राणप्रतिष्ठा सोहळा, सायंकाळी ७ वाजता
इंदापूर- पुणे येथील प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. केशव महाराज मुळीक यांचे कीर्तन होणार आहे. २८ एप्रिल श्री महासतीदेवी मंदीर येथे होम हवन कार्यक्रम होणार आहे. उपस्थितीचे आवाहन पूर्व सत्ता मानकरी मुळीक बंधू चांदेर यांनी केले आहे.