हिंदळे येथे हनुमान जयंती उत्सव साजरा

आचरा–अर्जुन बापर्डेकर
जय हनुमान मित्र मंडळ हिंदळे वरची वाडी तालुका देवगड तर्फे तीन पिंपळ येथे हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला .यानिमित्त सोमवारी रात्रौ नृत्यविकास स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. मंगळवारी पहाटे सहा वाजता हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात आला. त्यानंतर सत्यनारायण महापूजा दुपारी महाप्रसाद सायंकाळी विविध खेळ स्थानिकांची भजने रात्रौ महाराष्ट्र शासनाचा अशोक केळकर मराठी भाषा अभ्यास पुरस्कार 2023 विजेते डॉक्टर प्रकाश परब यांचा तसेच प्राध्यापक अविनाश बापट यांचाही विशेष सत्कार यावेळी करण्यात आला.यावेळी विविध स्पर्धांमधील विजेत्यांना पारितोषिके वितरण करण्यात आली
हनुमान जन्मोत्सव दिवशीच्या रात्री ब्राह्मण देव सांस्कृतिक दिंडी मंडळ आचरा पारवाडी, श्री भगवती प्रासादिक वारकरी दिंडी भजन मंडळ चिंदर भटवाडी, विठ्ठल रखुमाई प्रासादिक भजन मंडळ बुधवळे मठ बुद्रुक यांच्या दिंडी अविष्काराने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केली