पशु-पक्ष्यांची ताण-भुक भागविण्यासाठी माऊली मित्र मंडळाने पाण्याची आणि धान्यांची भांडी ठेवून भूतदया जोपासली- राजेंद्र पेडणेकर

कणकवलीत राबविला आगळा-वेगळा उपक्रम;उन्हाळ्यात घेतली पशुपक्ष्यांची काळजी
कणकवली – कडक उन्हाळा सुरु झाल्याने एप्रिल महिन्यामध्ये३८ अंश सेल्सिअसपर्यंत तापमान पोचल्याने माणसासह प्रत्येक जीव हैराण झाला आहे. पशु-पक्षी पाण्यासाठी वणवण करत घराच्या जवळ घिरट्या घालत अहो, आमच्यासाठी दाणा पाणी ठेवा हो..! चिमणी पाखरांची आर्त हाक ओळखा ओ अशी साद घालीत अशाच भावनेतून हे पशु पक्षी घिरट्या घालत आहेत.
म्हणूनच माऊली मित्र मंडळाच्या वतीने आज कणकवली येथील जूना भाजी मार्केट आणि श्री.पटकीदेवी मंदिर येथे पशु-पक्ष्यांसाठी भांड्यातून पाणी आणि धान्य ठेवून भूतदया जोपासली आहे असे प्रतिपादन माऊली मित्र मंडळ कणकवली चे अध्यक्ष आणि पर्यावरण प्रेमी श्री.राजेंद्र पेडणेकर यांनी केले..
ते कणकवली येथे बोलत होते.यावेळी माऊली मित्र मंडळाचे सल्लागा तथा ग्राहक पंचायत जिल्हा संघटक दादा कुडतरकर ,साजिद कुडाळकर, सुभाष उबाळे, अविनाश गावडे ,प्रभाकर कदम, भगवान कासले, बाबुराव घाडीगावकर, प्रदीप कुमार जाधव, प्रसाद उगवेकर, विशाल राजपूत , लक्ष्मणराव महाडिक,यांच्यासह श्री फटकीदेवी मित्र मंडळाचे विवेक मुंज,दिपक डगरे, तन्मय उबाळे,विलास चव्हाण आदी उपस्थित होते.
यावेळी राजेंद्र पेडणेकर म्हणाले की,
निसर्गाच्या साखळी मध्ये प्राणी पक्षानांही महत्व आहे.घराच्या अंगणात, गच्चीवर प्राणी-पक्ष्यांसाठी पाणी आणि धान्य ठेवण्याचे आवाहन करताना पेडणेकर म्हणाले सामाजिक संस्था व पक्षीमित्रांनी वन्यजीव व पक्ष्यांचा जीव वाचवण्यासाठी प्रामुख्याने पुढे यावे.
यावेळी माऊली मित्र मंडळांचे सल्लागार तथा ग्राहक पंचायत जिल्हा संघटक दादा कुडतरकर म्हणाले की,निसर्गाच्या साखळीमध्ये प्राणी-पक्ष्यांनाही महत्त्व आहे. सद्यस्थितीत सर्वत्र पाण्याचा तुटवडा आहे. त्यामुळे एक जबाबदार नागरिक, सामाजिक भान, माणुसकी म्हणून माऊली मित्र मंडळ प्राणी-पक्ष्यांसाठी, त्यांची तहान भागवण्यासाठी, त्यांचा जीव वाचवण्यासाठी उन्हाळ्याच्या दिवसात भांड्यातून पाणी आणि धान्य ठेवून सामाजिक बांधिलकी जपत आहेत.मंडळाचा हा उपक्रम स्तुत्य आणि कौतुकास्पद आहे.
साजिद कुडाळकर म्हणाले की, सध्या सर्वांनाच उष्णतेच्या तीव्र झळा लागत आहेत. प्राणी पक्ष्यांची तहान भागविण्यासाठी आपण तळमळीने प्रयत्न केले पाहिजेत.याच माणुसकीच्या भावनेतून पशु-पक्ष्यांची तहान आणि भुक भागविण्यासाठी भांड्यातून पाणी आणि धान्य ठेवून आगळा -वेगळा उपक्रम माऊली मित्र मंडळाने राबवून एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे.





