भुईबावडा घाटमार्ग अवजड वाहतुकीस खुला करा!

युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांची मागणी

भुईबावडा घाटमार्ग अवजड वाहतुकीस खुला न केल्यास, युवासेना प्रशासनाला विचारणार जाब

भुईबावडा घाटातून अवजड वाहने बंद करण्याचे आदेश कलेक्टर ऑफिस मधून देण्यात आले आहेत. हा आत्ताचा सीझन हा आंबा, काजू बागायत दारांसाठी महत्वाचा सिझन आहे. अशा मध्ये हा घाटमार्ग अवजड वाहनांसाठी बंद करण्यात आल्या मुळे या बागायतदारांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अशामुळे 6 टायर गाड्यांना तरी मुभा देण्यात यावी. कारण हा एकच घाटमार्ग त्याबाजूने जी खारेपाटण वाहतूक होते त्यांना भुईबावडा हा मार्ग जवळचा आहे. आणि हाच मार्ग बंद केल्यामुळे त्यांना फोंडाघाट मार्गे वाहतूक करावी लागत आहे व त्यामुळे त्यांना 70 किलोमीटर चा भुर्दंड हा वाहन चालकांना पडतो. त्यामुळे ही वाहतूक भुईबावडा घाटमार्गे च चालू रहावी,आणि 6 चाकी वाहनाना त्यात मुभा द्यावी अशी मागणी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी केली आहे. लवकरात लकवर ही युवासेनेची मागणी पूर्ण करावी नाहीतर युवासेना प्रशासनाला जाब विचारल्या शिवाय राहणार नाही. अशी भुमिका युवासेनेच्या माध्यमातून घेण्यात आली आहे.

कणकवली प्रतिनिधी

error: Content is protected !!