शिवडाव हायस्कूलचे मुख्याध्यापक राजेश वाळवे यांचे निधन

कणकवली तालुक्यातील शिवडाव हायस्कूलचे मुख्याध्यापक राजेश वाळवे (53) यांचे काल शनिवारी रात्री हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. विद्यार्थी प्रिय व कलावंत शिक्षक म्हणून ते परिचित होते. हायस्कूलच्या यशासाठी झटणारे आदर्श व्यक्तीमत्व म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा असा परिवार आहे.
कणकवली /प्रतिनिधी