माजी आमदार राजन तेलींच्या व्हाट्सअप स्टेटस मुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात खळबळ!

जिल्हा भाजपमधील गटबाजी चव्हाट्यावर?

कोणाच्यातरी हट्टा मुळे सभा रद्द, हा “कोण” कार्यकर्त्यांमध्ये सवाल

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष माजी आमदार राजन तेली यांनी ठेवलेल्या व्हाट्सअप स्टेटस ने सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडाली असून, सावंतवाडी विधानसभेतील भारतीय जनता पार्टीच्या नियोजित सभा कोणाच्या तरी हट्टामुळे दोन वेळा रद्द झाल्या. कार्यकर्त्यांनी अतिशय मेहनत करून सभेचे नियोजन केले होते. माझ्या कार्यकर्त्यांना झालेल्या त्रासा बद्दल माफी मागतो अशा आशयाचे स्टेटस भाजपातील अंतर्गत गटबाजीला तोंड फुटले आहे. हा तो कोण? असा सवाल उपस्थित केला जात असून राजन तेलीच्या स्टेटस मुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भाजपामध्ये खळबळ उडाली आहे.

दिगंबर वालावलकर/ सिंधुदुर्ग

error: Content is protected !!