नांदगाव महामार्ग हद्द निश्चित करण्यासाठी मोजणीस्थळी पोलिसांचा बंदोबस्त

मोजणी अंतिम टप्प्यात; मोजणीच्या सुरुवातीलाच विरोध केल्याने तणाव
कणकवली तालुक्यातील नांदगाव येथे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ च्या हद्द निश्चितीसाठी शुक्रवारी मोजणी हाती घेण्यात आली होती. काही मुद्द्यांवर जमीनधारकांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला, मात्र प्रशासनाने अधिकृत मोजणी असून ही मोजणी होणार, ज्यांच्या अडचणी असतील त्यांनी आपल्या तक्रारी कराव्यात ,असे अधिकाऱ्यांनी सांगितले.त्यानंतर मोजणी पोलीस बंदोबस्तात सुरुवात करण्यात आलेली आहे.
यावेळी जुन्या मोजणी प्रमाणे मोजणी करा व सर्व लगत असलेल्या गट क्रमांकांची मोजणी करण्यात यावी अशी मागणी लगत असलेल्या जमीन मालकांनी केली .यावेळी नांदगाव येथे पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आल्याने पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
महामार्ग पूर्ण झाला पण महामार्गाची हद्द कुठे पर्यंत व शेतकऱ्यांच्या जमिनी कुठपर्यंत गेल्या व आता हायवे हद्द कुठपर्यंत असणार आहे. याबाबत हद्द निश्चित करण्यासाठी अखेर शुक्रवार दिनांक १२ एप्रिल रोजी मोजणी साठी हायवे प्राधिकरण, भुमी अभिलेख,केसीसी कंपनी आली. मात्र लगत असलेल्या जमिन मालकांना सदर नोटीशीमध्ये गट क्रमांक उल्लेख नसल्याने जमीन मालकांनी विरोध केला. मोजणी करायची तर अर्धवट गट न करता संपूर्ण मोजणी करावी तसेच जुनी मोजणी करून हायवे हद्दी निस होते. त्या पुढे आल्यास आमचा विरोध आहे.अशी भुमिका मांडली. आता प्रत्यक्ष मोजणी अंतिम टप्प्यात आली असून हद्द निश्चितीसाठी प्रक्रिया सुरू झाली आहे.
यावेळी नांदगाव येथे मोजणी सुरळीत पार पाडण्यासाठी कणकवली पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.यामुळे नांदगाव तिठा परिसरात पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते. यामध्ये पोलीस सहाय्यक निरीक्षक मनोज पाटील, पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ, शरद देठे, पोलीस हवालदार चंद्रकांत झोरे, महीला पोलीस स्मिता माने, महिला पोलिस सुप्रिया भागवत आदी कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहे.
यावेळी नांदगाव सरपंच भाई मोरजकर,उपसरपंच इरफान साटविलकर नांदगाव प्रभारी पोलीस पाटील पांडू मयेकर, हायवे प्राधिकरण अभियंता अतुल शिवनिवार, कुमावत,भुमिअभिलेख व केसीसी कंपनी कर्मचारी उपस्थित होते.
कणकवली प्रतिनिधी