माऊली मित्रमंडळाचे सल्लागार सी.आर.चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त 28 मे ला क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

माऊली मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र पेडणेकर यांनी माहिती

कणकवली – माऊली मित्रमंडळाच्या वतीने सिंधुदूर्ग जिल्ह्यात विविध सामाजिक उपक्रम राबविले जात आहेत. माऊली मित्रमंडळाचे सल्लागार सी. आर.चव्हाण यांचा बुधवार 29 मे रोजी 59 वा. वाढदिवसानिमित्त कणकवली शहरात वाढदिवसाचे औचित्य साधून मंगळवार 28 मे रोजी कणकवली शहरात नाईट अंडर आर्म क्रिकेट स्पर्धेचे माऊली मित्रमंडळाच्या वतीने कणकवली शहरात आयोजन करण्यात येणार आहे.

माऊली मित्रमंडळ जिल्ह्यात सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे. सर्वसामान्य नागरिकांनच्या प्रश्नांनाबाबत उठवलेला आवाज त्यातून आम्हाला जनतेतून मिळालेली साथ आमचे समर्थ कार्यकर्ते यांच्या साथीवर आमचा प्रवास सुरु आहे. त्याच कल्पनेतून माऊली मित्रमंडळाचे सल्लागार सी.आर.चव्हाण यांचा 59 व्या वाढदिवसानिमीत्त कणकवली शहरात नाईट अंडर आर्म क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात येणार असल्याचे माऊली मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र पेडणेकर यांनी माहिती दिली.

माऊली मित्रमंडळाच्या वतीने रक्तदान शिबिर, वृद्धांसाठी आरोग्य शिबीर, सार्वजानिक ठिकाणीं स्वच्छता अभियान राबविले जाणार असल्याचा माऊली मित्रमंडळाचा मानस आहे.

यावेळी सुभाष उबाळे, अविनाश गावडे भगवान कासले प्रभाकर कदम, प्रसाद उगवेकर लक्ष्मण महाडिक, प्रसाद पाताडे, योगेश रंगराव पवार , निलेश निखार्गे, ज्ञानदेव मोडक, संतोष चव्हाण, बाबुराव घाडीगावकर, हेमंत नाडकर्णी, विशाल रजपूत, सईद नाईक जमिल कुरैशी, नुरमहम्मद शेख आदी उपस्थीत होते.

कणकवली शहरातील 19 वर्षापुढील मुलींसाठी या क्रिकेट स्पर्धेत सहभागी व्हावे. हा माऊली मित्रमंडळाचा मानस आहे. मुलींमध्ये नवंचैत्यन्य निर्माण व्हावे याचं दृष्टीकोनातून नाना विविध उपक्रम सतत चालू आहेत.

जिल्ह्यातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. महिलांनी या क्रिकेट स्पर्धेत सहभागी घ्यावा. पुरुष आणि एकसमानता हवी. आपल्या तालुक्यांतील मुलांमधील कलागुण आहेत. ते दाखविण्याची संधी आम्हाला मिळावी. हेच ध्येय अंगाशी बाळगून आपल्या वाढदिवसानिमित्त माऊली मित्रमंडळाच्या वतीने ही क्रिकेट स्पर्धा भरविण्यात आली असल्याचे सी.आर .चव्हाण यांनी सांगितले.

error: Content is protected !!