कोकण रेल्वे मार्गावर आजपासून धावणार होळी स्पेशल 

‘या’ गाड्यांचा समावेश  

ब्युरो । सिंधुदुर्ग : शिमगोत्सव दहा दिवसांवर येऊन ठेपला असून गावी जाण्यासाठी चाकरमान्यांची लगबग सुरू झाली आहे. म्हणूनच कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या रेल्वे गाड्यांना उसळणारी गर्दीची तीव्रता कमी करण्यासाठी पुणे करमळी,  करमळी-पनवेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस-मडगाव या साप्ताहिक होळी स्पेशल गाड्या चालवण्यात येणार आहेत. यातल्या करमळी-पनवेल स्पेशलचं  आरक्षण काल गुरुवारपासून तर अन्य दोन स्पेशल गाड्यांच आरक्षण आजपासून खुलं झाल आहे. 
 ०१४४५ आणि ०१४४६  क्रमांकाची पुणे-करमळी साप्ताहिक स्पेशल गाडी 24 फेब्रुवारी म्हणजे आज तसंच  ३, 10 आणि 17 मार्चला  शुक्रवारी धावेल. पुण्यातून  सायंकाळी साडेपाच वाजता सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी साडेआठ वाजता करमळी इथं हि गाडी पोहोचे. परतीच्या प्रवासात 26 फेब्रुवारी तसंच  5, 12 आणि 19 मार्चला रविवारी करमळी इथून सकाळी नऊ वाजून वीस मिनिटांनी सुटून त्याच दिवशी रात्री अकरा वाजून 35 मिनिटांनी पुण्यामध्ये पोहोचेल. 22 डब्यांच्या या स्पेशलला लोणावळा, कल्याण, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डे, संगमेश्वर, रत्नागिरी, आडवली, राजापूर, वैभववाडी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी, थिवी  अशा स्थानकावर थांबे देण्यात आले आहेत. या स्पेशल मुळे पुण्यातल्या चाकरमान्यांना होळीसाठी गाव गाठणं  सुलभ होणार आहे. 
०१४४८ आणि ०१४४७ क्रमांकाची करमळी पनवेल साप्ताहिक स्पेशल 25 फेब्रुवारी तसंच  4, 11, 18 मार्च रोजी शनिवारी धावेल. करमळी इथून सकाळी नऊ वाजून वीस मिनिटांनी सुटून त्याच दिवशी रात्री ८ वाजून १५  मिनिटांनी पनवेल इथं ही गाडी पोहोचेल. परतीच्या प्रवासात 25 फेब्रुवारी तसंच 4, 11, 18 मार्चला धावणारी ही स्पेशल पनवेल इथून रात्री दहा वाजता सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी साडेआठ वाजता करमळीला पोहोचेल. 22 डब्यांची ही स्पेशल थिविम, सावंतवाडी, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, वैभववाडी, राजापूर, आडवली, रत्नागिरी, संगमेश्वर, सावर्डे, चिपळूण, खेड, वीर, माणगाव, रोहा, या स्थानकांवर थांबेल. 
०१४५९ आणि ०१४६० क्रमांकाची लोकमान्य टिळक टर्मिनस मडगाव साप्ताहिक स्पेशल 26 फेब्रुवारी तसंच पाच आणि 12 मार्चला  रविवारी धावेल. ही गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस इथून रात्री सव्वा दहा वाजता सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी साडेदहा वाजता मडगावला पोहोचेल. परतीच्या प्रवासात 27 फेब्रुवारी तसंच सहा आणि 13 मार्चला सोमवारी धावणारी ही स्पेशल मडगाव इथून सकाळी 11 वाजता सुटून त्याच दिवशी रात्री पावणे बारा वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस इथं पोहोचेल. 17 डब्यांची ही स्पेशल ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डे, संगमेश्वर, रत्नागिरी, आडवली, राजापूर, वैभववाडी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी, थिवी, करमळी या स्थानाकांवर थांबणार आहे. या स्पेशल गाड्यांच आरक्षण सुद्धा आज पासून खुलं होणार असल्यान चाकरमान्यांना  दिलासा मिळाला आहे. 

ब्युरो न्यूज, कोकण नाऊ, सिंधुदुर्ग.

error: Content is protected !!