अत्याधुनिक सिंधुकेअर हॉस्पिटल रुग्णांच्या सेवेसाठी सज्ज

सर्जिकल आयसीयूमध्ये गोव्याला ठरणार पर्याय
आज कुडाळमध्ये होतोय भव्य शुभारंभ
डॉ. मकरंद आणि डॉ. गौरी परुळेकर यांचे वैद्यकीय क्षेत्रात एक नवं दालन
निलेश जोशी । कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्हयात कुठेही अपघात झाला कि गंभीर रुग्णाला तातडीनं गोवा किंवा कोल्हापूरला हलवण्याचा पर्याय होता. त्यात काहीवेळा रुंगणाच्या जीवावर देखील बेतायच. नेमकी हीच अडचण ओळखून डॉ. मकरंद आणि डॉ. गौरी परुळेकर यांनी कुडाळ मध्ये मुंबई गोवा महामार्गावर रिलायन्स पेट्रोल पंप नजीक अत्याधुनिक सोयीसुविधांनी सज्ज असं भव्य देखणे सिंधू केअर हॉस्पिटल सुरू करायचा संकल्प केला. आज तो संकल्प पूर्ण होतोय. या देखण्या आणि रुग्णांसाठी वरदान ठरणाऱ्या सिंधुकेअर हॉस्पिटलचा भव्य शुभारंभ सोहळा डॉ मकरंद परुळेकर यांच्या आई श्रीमती शर्मिला शामसुंदर परुळेकर यांच्या शुभहस्ते आज शनिवार 30 मार्चला होतोय. अत्याधुनिक सुविधा युक्त सिंधुकेअर हॉस्पिटल हे सर्जिकल आयसीयू मध्ये आता गोव्याला पर्याय ठरणार आहे. कुडाळ इथं झालेल्या पत्रकार परिषदेत डॉ. मकरंद परुळेकर यांनी याबद्दल अधिक माहिती दिली. यावेळी त्यांचे सहकारी डॉ. गौरी परुळेकर, डॉ. अमोघ चुबे, डॉ. वादिराज सवदत्ती, डॉ. संजय सावंत, डॉ. संजीव आकेरकर, डॉ. आकांक्षा गावडे उपस्थित होते.
माहिती तंत्रज्ञानाच्या युगात वाटचाल करताना सातत्यपूर्ण नावीन्यपूर्ण बदल घडत असतात या बदलांना आपल्याला सामोरे जावे लागते सर्वच क्षेत्रात बदल होत असताना वैद्यकीय क्षेत्रातही हे बदल झपाट्याने दिसून येत आहेत कोणताही अपघात झाला की येथील शासकीय व खाजगी रुग्णालयात उपचारासाठी रुग्ण आणले जातात त्यांच्यावर उपचार केले जातात मात्र पुढील उपचारासाठी गोवा बांबुळी हे वाक्य गेली बरीच वर्षे असून हे कुठेतरी थांबले पाहिजे या उदात्त हेतूने डॉ मकरंद परुळेकर यांनी आपल्या सिंधू केअर हॉस्पिटल मध्ये अत्याधुनिक उपकरणे असणारे ट्रामा केअर सेंटर सुरू केल्याने हे सिंधू केअर हॉस्पिटल आता गोव्याला पर्याय ठरणार आहे असेच म्हणावे लागेल
सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुंबई गोवा महामार्गावर रिलायन्स पेट्रोल पंप नजीक डॉ मकरंद परुळेकर व स्त्री रोग तज्ञ डॉ गौरी परुळेकर यांचे भव्य देखणे सिंधू केअर हॉस्पिटल सुरू होत आहे त्याचा उद्घाटन सोहळा डॉ मकरंद परुळेकर यांच्या आई श्रीमती शर्मिला शामसुंदर परुळेकर यांच्या शुभहस्ते आज शनिवार 30 मार्चला होत आहे अत्याधुनिक सुविधा युक्त सिंधुकेअर हॉस्पिटल हे आता गोव्याला पर्याय ठरणार आहे
डॉ परुळेकर पुढे म्हणाले गेली बरीच वर्षे आपण वृत्तपत्रात दुचाकी चारचाकी वाहनांत अपघात झाला यामध्ये जखमी झालेल्या रुग्णांना जिल्हयातील खाजगी व शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले जाते तिथे नुसते दाखल केल्यानंतर शेवटचा पर्याय सबंधित रुग्णाला पुढील उपचारासाठी गोव्याला हलविण्यात आले असे बरीच वर्षे आम्ही वृत्तपत्रातून वाचतो मात्र सिंधुदूर्ग जिल्ह्यात ट्रॉमा केअर सेंटरची पावले उचलली गेली नाहीत याबाबत माझी व डॉ वादीराज सवदत्ती यांच्यात चर्चा झाली अखेर आम्ही ही सेवा सिंधूकेअर हॉस्पिटलच्या माध्यमातून देणार आहोत
या हॉस्पिटलमध्ये एम एस (ऑर्थो मुंबई) कन्सल्टिंग ऑर्थोपेडिक सर्जन डॉ मकरंद परुळेकर, एम एस डी एन बी( मुंबई)स्त्री रोगतज्ञ सोनोलॉजिस्ट डॉ गौरी परुळेकर डीए (मुंबई) इंटेसिविस्ट डॉ वादीराज सवदत्ती एम डी (पथोलॉजीस्ट) डॉ संजय सावंत, डीसी एच (मुंबई )बालरोग तज्ञ डॉ अमोघ चुबे एम डी (डायलिसिस, मुंबई) डॉ संजीव आकेरकर बीपीटी (फिजिओ पुणे) डॉ आकांक्षा गावडे आदी नामांकित डॉक्टर, त्यांचा स्टाफ तसेच राज्यभरातील इतर डॉक्टर्स या ठिकाणी सेवा देणार आहेत. या सिंधुकेअर हॉस्पिटल मध्ये प्रत्येक विभाग रुग्णांना सेवा देण्यासाठी 24 तास कार्यरत असणार आहे. रुग्णसेवा देतानाच अद्ययावत मशिनरी या ठिकाणी असणार आहेत ही या सिंधूकेअर हॉस्पिटलची विशेषत: आहे. या हॉस्पटिलमध्ये लॅमिनार ओटी, आर्थोपेडिक, बालरोग, स्त्री रोग, आयसीयू, डायलेसिस, पॅथॉलॉजी, फिजिओथेरपी या सुविधा मिळणार आहेत. त्यामुळे सिंधुकेअर हॉस्पिटल गोव्याला जावे लागणाऱ्या पेशंटसाठी एक उत्तम पर्याय म्हणावा लागेल.
निलेश जोशी, कोकण नाऊ, कुडाळ. .